कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
काजू खरेदी करताना आडकाठी केल्यास पोलिस संरक्षण
सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार संघ शेतकऱ्यांच्या ‘काजू बी’ ला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. कुणी आडकाठी केल्यास पोलिस संरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार संघ शेतकऱ्यांच्या ‘काजू बी’ ला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे खरेदीदार काजू बी खरेदी करताना कुणी आडकाठी केल्यास पोलिस संरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांनी येथे दिली.
सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार संघाच्या माध्यमातून काजू बी चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चांगला दर मिळवून देण्यासाठी थेट कारखानदारांना गाठून खरेदीसाठी आग्रह धरला जात आहे. अशा पद्धतीचा प्रयोग गेल्यावर्षी करण्यात आला होता. परंतु काही कारखानदारांनी आडकाठी केली होती. त्या अनुषंगाने संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना शेतकरी, कारखानदार आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.२) प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संघाचे अध्यक्ष विलास सावंत, प्रकाश वालावलकर, सौरभ सिद्धये, अभिलाष देसाई आदी उपस्थित होते.
कारखानदार संघटनेने नियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहता येत नसल्याचे पत्राद्वारे कळविले. त्यामुळे प्रांताधिकारी आणि काजू उत्पादकांमध्ये चर्चा झाली. काजू उत्पादकांनी आपली बाजू मांडली. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही तर काजू बी परवडत नाही. सध्या मिळत असलेल्या भावानुसार उत्पादन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे आम्ही थेट काजू विक्रीकरिता कारखानदार किंवा खरेदीदार शोधून काजू बी विक्री करणार आहोत. अशा पद्धतीने विक्री सुरू केल्यानंतर काही ठिकाणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला जातो, असे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देखील काजू बी खरेदीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही विरोध करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी खांडेकर यांनी शेतकऱ्यांना चांगला दर कुणी खरेदीदार देत असेल तर त्यांनी त्याच्याकडे विक्री करावी. त्याला कुणीही आडकाठी करू शकणार नाही. गरज भासल्यास आम्ही त्याला पोलिस संरक्षण देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. कारखानदार अनुपस्थित राहिल्यामुळे अपेक्षित चर्चा या बैठकीत होऊ शकली नाही.
- 1 of 1098
- ››