राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
बातम्या
‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा विकासाला अडथळा
सोलापूर : सोलापूरच्या विकासाला श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा आहे. चिमणी पाडल्याविना या ठिकाणचा विकास अशक्य आहे. त्यामुळे विकासाला अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी संबंधित यंत्रणेकडून तत्काळ पाडण्यात यावी, अशी मागणी संजय थोबडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

सोलापूरची विमानसेवा सुरळीत होण्यासाठी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतीत मागील वर्षभरापासून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, आतापर्यंत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे चिमणी लवकर न हटविल्यास उडाण योजनेतून सोलापूरचे नाव वगळण्याची शक्यता असल्याचेही गुंगे यांनी या वेळी सांगितले.
केंद्र सरकारची विमान सेवेबाबतची उडाण योजना दोन वर्षांपूर्वी जाहीर झाली. त्यामध्ये सोलापूरच्या नावाचा समावेशही झाला. मात्र, सोलापूर वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये उडाणअंतर्गत विमानसेवा सुरूही झाली. विमानसेवा सुरळीत होण्याकरिता अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अद्यापही पाडलेली नाही. त्याचा परिणाम सोलापूरच्या विकासावर होत असून, आता वेळ न घालविता ती तत्काळ पाडावी, अशी मागणी गुंगे यांनी केली. या पत्रकार परिषदेसाठी अर्जुन अर्शिद, महेश हब्बू आदी उपस्थित होते.
- 1 of 910
- ››