agriculture news in Marathi, obstruction from talathi in crop registration, Maharashtra | Agrowon

पीकपेरा नोंदीसाठी तलाठ्यांकडून अडवणूक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

जळगाव ः शासनाने हमीभावात कडधान्य खरेदीसंबंधी कार्यवाही सुरू केल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मूग, उडीद पिकाच्या नोंदीचा सातबारा अत्यावश्‍यक आहे. परंतु हे सातबारा उतारे देण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहे. प्रथम थेट शेतात जाऊन पाहणी करेल, मग उडीद, मूग पिकाची नोंद करून सातबारा देईन, अशी अडवणूक तलाठी करू लागले आहेत. अमळनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील करणखेडा येथील शरद धनगर यांना असाच अनुभव आला असून, त्यांनी या संदर्भात ॲग्रोवनकडे तलाठ्याकडून झालेल्या अडवणुकीची आपबिती सांगितली. 

जळगाव ः शासनाने हमीभावात कडधान्य खरेदीसंबंधी कार्यवाही सुरू केल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मूग, उडीद पिकाच्या नोंदीचा सातबारा अत्यावश्‍यक आहे. परंतु हे सातबारा उतारे देण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहे. प्रथम थेट शेतात जाऊन पाहणी करेल, मग उडीद, मूग पिकाची नोंद करून सातबारा देईन, अशी अडवणूक तलाठी करू लागले आहेत. अमळनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील करणखेडा येथील शरद धनगर यांना असाच अनुभव आला असून, त्यांनी या संदर्भात ॲग्रोवनकडे तलाठ्याकडून झालेल्या अडवणुकीची आपबिती सांगितली. 

शरद यांनी दोन एकरांत मुगाची पेरणी केली होती. तसेच काही क्षेत्रात आंतरपीक म्हणूनही मुगाचे पीक घेतले आहे. आता शासकीय कडधान्य खरेदी पुढील महिन्यात सुरू होईल. या केंद्रात धान्य विक्रीसाठी संबंधित केंद्रात नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी फक्त ९ ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत आहे. या केंद्रात मुगाच्या विक्रीसंबंधी मूग पिकाची नोंद असलेला सातबारा आवश्‍यक असून, त्यासाठी शरद यांनी आपल्याशी संबंधित तलाठी कार्यालयात संपर्क साधला. परंतु तलाठी रजेवर आहे.

अधिकची चौकशी केली असता नंदगाव (ता. अमळनेर) येथील तलाठी यांच्याकडे करणखेडा व काही गावांचा प्रभार आहे. मग नंदगाव येथील तलाठी यांच्याकडे मूग पिकाची नोंद असलेल्या सातबाऱ्याची मागणी त्यांनी केली. परंतु तलाठी यांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी करील. मूग पीक घेतल्याची खात्री झाल्यानंतरच सातबारा देईन, असे सांगितले. पण ही पाहणी केव्हा करील, हे मात्र तलाठी यांनी सांगितलेले नाही. 

९ ऑक्‍टोबरपूर्वी ही पाहणी झाली नाही तर शासकीय खरेदी केंद्रात मूग विक्रीसंबंधी नोंदणी करता येणार नाही. मग मूग पडून राहील. नुकसान होईल. एकामागून एक दिवस जात आहे. ३० सप्टेंबरला रविवार आहे. मग २ ऑक्‍टोबरला गांधी जयंतीची सुटी 
राहील. 

तलाठी यांनी पाहणी करावी, पण तातडीने कार्यवाही करायला हवी आणि लागलीच सातबारा उतारा द्यावा. एकाच तलाठ्याकडे सात-आठ गावांचा प्रभार आहे. त्यात अशी अडवणूक केली जात असल्याने शासकीय खरेदी केंद्रात नोंदणी कशी करता येईल, असा प्रश्‍नही शरद यांनी ॲग्रोवनशी बोलताना उपस्थित केला.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...