agriculture news in Marathi, ocean spate continue in third day, Maharashtra | Agrowon

तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

सिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले उधाण शुक्रवारी (ता.१४) तिसऱ्या दिवशीही कायम होते. लाटा किनाऱ्यावर आदळत असून देवबाग येथील आठ मच्छीमारांच्या ५४ जाळ्यां वाहून गेल्या आहेत. किनारपट्टीला वाढलेला धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवाना समुद्रात पूर्णतः बंदी केली असून पर्यटकांना देखील मनाई केली आहे.

सिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले उधाण शुक्रवारी (ता.१४) तिसऱ्या दिवशीही कायम होते. लाटा किनाऱ्यावर आदळत असून देवबाग येथील आठ मच्छीमारांच्या ५४ जाळ्यां वाहून गेल्या आहेत. किनारपट्टीला वाढलेला धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवाना समुद्रात पूर्णतः बंदी केली असून पर्यटकांना देखील मनाई केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायुवादळामुळे आलेले उधाण तिसऱ्या दिवशीही कायम होते. लाटा किनाऱ्याला येऊन धडकत आहेत. त्यामुळे किनारपट्टीचे लोक जीव मुठीत धरून राहत आहेत. त्यांच्यावरील भितीचे सावट अद्याप दूर झालेले नाही. दरम्यान मालवण तालुक्यातील नवाबाग, दाभोली, वायगंणी, या भागातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे देवबाग येथील आठ मच्छीमारांची अडीच लाख रुपये किमतीची ५४ जाळी वाहून गेली आहेत. यामध्ये गणपत केळुसकर-८ जाळी, नारायण वेंगुर्लेकर-७ जाळी, इच्छाराम मालवणकर-७ जाळी, श्‍यामसुंदर कोळकर-८ जाळी, प्रकाश मोठे-८ जाळी, दत्ताराम कोळकर-७ जाळी, मुकुंद खडपकर-७ जाळी, देंवेंद्र तांडेल-४ जाळी, या मच्छीमार बांधवांचा समावेश आहे.

दरम्यान, समुद्र अजूनही खवळलेला असून अजस्र लाटा किनाऱ्याला धडकत आहे. वायुवादळाचा प्रभाव अजून काही दिवस राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने धोक्याचा तिसरा बावटा फडकवला आहे. मच्छीमार बांधवांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आले असून समुद्रकिनारी पर्यटकांना देखील मनाई करण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस
गुरुवारी सांयकाळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आंबोली, भुईबावडा, करूळ घाटमार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झाली. गेले दोन तीन दिवस चांगला पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ही पेरणी अंतिम टप्प्यात असून येत्या दोन तीन दिवसात भातपेरणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...