अोखी चक्रीवादळाने समुद्रात लाटांचे तांडव, पावसाचा तडाखा

अोखी चक्रीवादळाने समुद्रात लाटांचे तांडव, पावसाचा तडाखा
अोखी चक्रीवादळाने समुद्रात लाटांचे तांडव, पावसाचा तडाखा

मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काल सायंकाळी मुंबईसह नजीकच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचा जोर आज (ता. 5) वाढून मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पालघर, रायगड, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ओखी धडकत असताना त्याची तीव्रता कमी होत असली तरीही किनारपट्टी भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई किनारपट्टीवर ताशी सत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. पृष्ठभागांवरही ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. भरतीमुळे मंगळवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास चक्रीवादळामुळे सहा मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; तर दुपारी 12.45 वाजता पुन्हा भरती येणार असल्याने त्या वेळीही लाटांची उंची वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क, वरळी सी लिंक, वांद्रे, मरीन लाइन्ससह कोकणातील किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी शिरण्याची भीती आहे. 

काही भागांत वाऱ्याच्या वाढलेल्या वेगामुळे झाडे मोडण्याची शक्‍यता आहे. या काळात हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्‍यताही मुंबई सफर या प्रकल्पाचे अधिकारी डॉ. गुफ्रान बॅग यांनी व्यक्त केली. 

मच्छीमारांना मनाई  केंद्रीय वेधशाळेच्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री ओखी वादळाचे सुरत किनारपट्टीनजीकच्या भागांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई  किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली. सतर्कतेचा इशारा म्हणून पालिका आपत्कालीन विभागासासह तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्तीकालीन निवारण दल सज्ज झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com