agriculture news in marathi, October heat prediction in state | Agrowon

ऑक्टोबर हीटचा चटका वाढतोय

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पुणे: राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमानच्या पाऱ्याने तिशी पार केली आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे ढगांचे आच्छादन कमी होऊन ऑक्टोबर हीटचा चटका वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली. आज (ता. १) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे: राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमानच्या पाऱ्याने तिशी पार केली आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे ढगांचे आच्छादन कमी होऊन ऑक्टोबर हीटचा चटका वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली. आज (ता. १) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कच्छचे आखात आणि परिसरावर असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्र सोमवारी (ता. ३०) आणखी तीव्र झाले. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला, तर उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे होते. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, महाबळेश्वर वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. सकाळपासून जाणवणारा उन्हाचा चटका दुपारी आणखीनच तीव्र होत आहे. पावसाची उघडीप कायम राहिल्यास तापमानात वाढ होणार आहे.

सोमवारी (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.३ (-१.२), जळगाव ३३.२(-१.५), कोल्हापूर ३१.३ (१.२), महाबळेश्वर २१.६ (-२.२), मालेगाव ३३.२ (०.७), नाशिक २९.२ (-१.९), सांगली ३१.० (-०.२), सातारा ३०.५ (१.२), सोलापूर ३३.७ (१.३), अलिबाग ३०.७ (-०.१), डहाणू ३१.८ (०.३), सांताक्रूझ ३२.६ (१.१), रत्नागिरी ३१.६ (१.४), औरंगाबाद ३०.० (-१.४), परभणी ३२.९ (०.२), अकोला ३३.३ (-०.१), अमरावती ३०.४ (-१.६), बुलडाणा ३०.२ (-०.२), ब्रह्मपुरी ३४.० (१.२), चंद्रपूर ३४.४(१.०), गोंदिया ३०.०(-३.०), नागपूर ३२.४ (-०.९), वर्धा ३३.० (०.३), यवतमाळ ३२.०(-०.२). 


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...