agriculture news in marathi Odisha exempt agriculture work form lockdown | Agrowon

ओडिशात लॉकडाउनमध्ये शेतीच्या कामांना सूट

स्मृती सागरिका कानुनगो ः सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 एप्रिल 2020

ओडिशा सरकारने काही दिवसांपूर्वीच लॉकडाउनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविली आहे. याचा दुसरा टप्पा बुधवारपासून (ता.१५) सुरु होत असून त्यात काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे.

भुवनेश्‍वर : ओडिशा सरकारने काही दिवसांपूर्वीच लॉकडाउनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविली आहे. याचा दुसरा टप्पा बुधवारपासून (ता.१५) सुरु होत असून त्यात काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. ही माहिती विशेष मदत आयुक्त प्रदीप जेना यांनी नुकतीच दिली.

सध्या शेतात रब्बी पिकांची काढणी सुरु झाली असून खरिप हंगामाची तयारी व नागरिकांकडून लॉकडाउनसंबंधी आलेला प्रतिसाद पाहून पुढील गोष्टींना राज्यात लॉकडाउनमधून सूट दिली आहे.

  • पीक काढणी, मळणी, कृषी उत्पादनाची वाहतूक, विक्री आणि साठवणूक
  • भाजी मंडई, वातानुकूलित साठवण केंद्र
  • कृषी औजारांसाठी आवश्‍यक विक्री व दुरुस्ती केंद्र
  • मासेमारी व पशुपालनासंबंधातील उपक्रम
  • शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सहकारी बँका व सोसायट्या खुल्या राहतील
  • अन्न प्रक्रिया व पॅकेजिंग विभाग
  • पशुवैद्यकीय सेवा
  • मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, बिजू पक्का घर योजना व स्वच्छ भारत अभियानाशी निगडित कामे सुरु राहणार
  • शालेय शुल्क भरण्यास मुदतवाढ

लॉकडाउनमुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ओडिशातील खासगी शाळांनी शुल्क भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे शुल्क जून अखेरपर्यंत विना दंड भरणे पालकांना शक्य होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...