Agriculture news in Marathi Offense against a false advertiser of direct service recruitmentr | Agrowon

सरळसेवा भरतीची खोटी जाहिरात देणाऱ्यावर गुन्हा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

पुणे : ई-ग्रामपंचायत राज्यस्तरीय सरळसेवा निवड समितीच्या वतीने ‘ई-ग्रामपंचायत प्रकल्प भरती’ परीक्षा प्रक्रिया राबण्यात येत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशी कोणतीही भरती परीक्षा पुणे जिल्हा परिषदेकडून घेण्यात येत नसून, सोशल मीडियावर फिरणारे संकेतस्थळ ग्रामपंचायत विभागाचे नाही. जाहिरात देणाऱ्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

पुणे : ई-ग्रामपंचायत राज्यस्तरीय सरळसेवा निवड समितीच्या वतीने ‘ई-ग्रामपंचायत प्रकल्प भरती’ परीक्षा प्रक्रिया राबण्यात येत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशी कोणतीही भरती परीक्षा पुणे जिल्हा परिषदेकडून घेण्यात येत नसून, सोशल मीडियावर फिरणारे संकेतस्थळ ग्रामपंचायत विभागाचे नाही. जाहिरात देणाऱ्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ही जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीतील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याविरुद्ध ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे. 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त संकेतस्थळावर आहे, अशी खोटी जाहिरात देऊन आणि महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे सादरीकरण एप्रिल २०२० असे होमपेज तयार करून त्या संकेतस्थळाचा उल्लेख करून शासनातर्फे भरती आहे, असे भासविण्यात आले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे तरुणांची दिशाभूल झाली आहे. याशिवाय तरुणांकडून अर्ज शुल्क म्हणून पाचशे रुपये ऑनलाइन पैसे देखील भरण्यास सांगण्यात आले होते. या बाबत बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 


इतर बातम्या
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...