Agriculture News in Marathi In the office of the insurance company Mukkam Thoko Andolan | Agrowon

विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम ठोको आंदोलन 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत आहे.

जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयात मंगळवारी (ता.३०) सुरू केलेले मुक्काम ठोको आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम होते. 

मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन मंगळवारी सुरू करण्यात आले. 

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील ११ हजार ८०० मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी एर्गो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता. या मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये मंजूर झाले. मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन छेडले आहे. मंगळवारच्या रात्री विमा कंपनी कार्यालयात मुक्काम करणाऱ्या स्वाभिमानीच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांना शासनाचा हिस्सा मिळाला की विमा देऊ, असे उत्तर मिळत होते. किती हिस्सा बाकी आहे याचे उत्तर मात्र मिळत नव्हते, असे काळे यांनी सांगितले. 

कृषी अधीक्षकांना मिळाली नाहीत समाधानकारक उत्तरे 
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांनी बुधवारी (ता. १) प्रत्यक्ष विमा कंपनी कार्यालयाला भेट दिली. त्यांनीही काही प्रश्‍नांची उत्तरे आमच्यासमक्ष विमा कंपनीच्या यंत्रणेला विचारले. परंतु त्यांनाही समाधानकारक उत्तर संबंधित यंत्रणा देऊ शकली नाही, असेही काळे यांनी सांगितले. जोवर विमा परतावा प्रश्‍न निकाली निघत नाही, तोवर आमचा मुक्काम कायम असेल, असेही काळे यांनी सांगितले. या मुक्काम आंदोलनात, घनसावंगी, जालना, अंबड या तीन तालुक्यांतील मोसंबी उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोसंबी विमा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. एचडीएफसी एर्गो कंपनीचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, जय जवान जय किसान आदी घोषणांनी कंपनी कार्यालय दणाणून गेले होते.


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...