Agriculture news in Marathi Office at Sindhudurg; But farmers do not know | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना माहितीच नाही

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे कृषी कार्यालय आहे. परंतु ते बहुतांशी शेतकऱ्यांना नेमके कुठे आहे, हेच माहीत नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतो. परंतु कंपनीचे प्रतिनिधी वेळेत कधीच येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे कृषी कार्यालय आहे. परंतु ते बहुतांशी शेतकऱ्यांना नेमके कुठे आहे, हेच माहीत नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतो. परंतु कंपनीचे प्रतिनिधी वेळेत कधीच येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतर्गंत आंबा, काजूचा विमा उतरविला जातो. त्याकरिता नोव्हेंबर ते डिसेंबरचा कालावधी असतो. त्यानंतर आता भात आणि नाचणी या दोन पिकांचा विमा उतरविण्याचे काम सुरू आहे. २३ जुलै विमा घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु हजारो शेतकरी या विमा योजनेपासून लांबच राहिले आहेत. जिल्ह्यात विमा कंपनीचे सिंधुदुर्ग येथे मुख्य कार्यालय आहे. या शिवाय अलीकडेच या कंपनीने तालुकानिहाय काही प्रतिनिधीची सहा महिन्यांकरिता नेमणूक केलेली आहे. परंतु याची माहिती कित्येक शेतकऱ्यांना नाही.

विमा प्रतिनिधींकडून पंचनामा नाहीच
गेल्या काही वर्षात आंबा, काजूचे हजारो शेतकरी विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानस्थळी वेळेत न पोहोचल्यामुळे परताव्यापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यात अजूनही काही मंडळात पर्जन्यमापक नाहीत. त्याचा फटका बसला आहे. देवगड तालुक्यातील कित्येक आंबा उत्पादकांना कंपनीकडून वेळेत नुकसानीचे पंचनामे न झाल्यामुळे परतावा मिळालेला नाही.

अनेकदा आंबा हंगाम सुरू असताना अवकाळी पाऊस, चक्रीवादळाने नुकसान होते. परंतु कधीही या नुकसानीची माहिती घेण्यास विमा कंपनीचे प्रतिनिधी येत नाहीत. नाइलाजास्तव ही सर्व माहिती कृषी कार्यालयाला दिली जाते. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे होतात. कधी कधी कुणीच झालेल्या नुकसानीची पाहणी करीत नाही. परिणामी शेतकऱ्यांना विमा परताव्यापासून वंचित राहावे लागते.
- माधव साटम, शेतकरी, शिरगाव, ता. देवगड.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...