agriculture news in marathi, officers absent for review meeting, akola, maharashtra | Agrowon

अकोल्यातील खरीप आढावा बैठक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने गाजली
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या व पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या खरीप आढावा बैठकीला आत्मा, अग्रणी बँक, तसेच विमा कंपन्यांच्या प्रमुखांनी दांडी मारल्याची बाब समोर आली. या प्रकाराबाबत उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित असलेल्यांना नोटीस बजाविण्याची सूचना या वेळी करण्यात आली.

अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या व पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या खरीप आढावा बैठकीला आत्मा, अग्रणी बँक, तसेच विमा कंपन्यांच्या प्रमुखांनी दांडी मारल्याची बाब समोर आली. या प्रकाराबाबत उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित असलेल्यांना नोटीस बजाविण्याची सूचना या वेळी करण्यात आली.

आगामी खरीप हंगामाच्यादृष्टीने महत्त्वाची आढावा बैठक शुक्रवारी (ता. १७) पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. आमदार गोपिकिशन बाजोरीया, पालक सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या वेळी उपस्थित होते. 

बैठकीच्या सुरवातीलाच आमदार बाजोरीया यांनी गेल्यावर्षी झालेल्या कृषी महोत्सवाचा विषय उपस्थित केला. याबाबत आत्मा प्रकल्प संचालकांना त्यांनी विचारणा केली. मात्र, आत्मा प्रकल्प संचालक बैठकीला हजर नसल्याचे दिसून आले. ते बैठकीला गेले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ही खरीप आढावा बैठक पूर्वनियोजीत व महत्त्वाची बैठक असूनही ते अनुपस्थित असल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची सूचना या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना करण्यात आली. बैठकीत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचाही मुद्दा गाजला.

जिल्ह्यातून ५५ प्रस्ताव कंपनीकडे दाखल झालेले असताना केवळ पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कंपनीकडे ३८ प्रस्ताव प्रलंबित असून ११ प्रस्ताव शेतकरी पातळीवर असल्याचे कृषी अधीक्षक अधिकारी अरुण वाघमारे यांनी सांगितले. आलेले प्रस्ताव व मंजूर प्रस्तावांची माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याने द्यावी, असे पालकमंत्र्यांनी सुचविले असता कंपनीचा कोणीही अधिकारी या बैठकीला आलेला नसल्याचे सांगण्यात आले. याच मुद्याला अनुसरुन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित अधिकारी प्रतिसादच देत नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी याची गांभिर्यांने दखल घ्यावी, अशी विनंती केली.  

पीकविम्याच्या मुद्यावर आमदार गोपिकिशन बाजोरीया यांनी विचारणा केली. जिल्ह्यात झालेले नुकसान, मंजूर भरपाई याचा ताळमेळ बसत नसल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. याविषयावरही कंपनीच्या अधिकाऱ्यास समाधानकारक माहिती देता आली नाही. पीक कर्जवाटपाचा मुद्दा उपस्थित झाला असताना जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख उपस्थित नसल्याने हा विषयच चर्चेला घेतला गेला नाही.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...