agriculture news in Marathi officers arrest due to bribe Maharashtra | Agrowon

लाचप्रकरणी मत्स्य विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त जाळ्यात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला गुरुवारी (ता.८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. 

कोल्हापूर ः नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्ताला गुरुवारी (ता.८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. प्रदीप केशव सुर्वे (रा. कारंडेमळा) असे त्याचे नाव आहे. विभागाच्या पथकाने लक्ष्मीपुरी परिसरात कारवाई केली.

याबाबत विभागाने दिलेली माहिती अशी, सुर्वेकडे कसबा बावडा येथील मस्त्य व्यवसाय कार्यालयात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तक्रारदारांचा मत्स्य उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन जलाशय ठेके तत्त्वावर आहेत. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. यानंतर राज्य शासनाने पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली होती. त्यानुसार तक्रारदारांच्या संस्थेच्या जलाशयांचे महसूल विभागामार्फत रीतसर पंचनामे करण्यात आले होते. 

नुकसानभरपाई मिळण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार शासनाने तक्रारदारांच्या संस्थेस माशांची नुकसान भरपाई म्हणून २६ लाखांची रक्कम त्यांच्या संस्थेच्या बॅंक खात्यावर सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामार्फत १४ सप्टेंबरला जमा करण्यात आली, पण अद्याप त्यांना मत्स्य जाळ्यांची नुकसानभरपाई मिळाली नाही.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी तक्रारदारांची संशयित प्रभारी सहायक आयुक्त सुर्वेंची भेट झाली. त्यावेळी सुर्वेने कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामुळेच २६ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. त्याबदल्यात १० लाख रुपये सुर्वेने त्यांच्याकडे मागितले. अन्यथा उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम संस्थेला मिळणार नाही, असेही सांगितले. त्यानंतर सात लाख रुपये व तडजोडीनंतर तक्रारदारांकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता दोन लाख व नंतर उरलेले तीन लाख रुपये देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. या नुसार कारवाई झाली.

ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, कर्मचारी शरद पोरे, अजय चव्हाण, रूपेश माने, मयूर देसाई व चालक सूरज अपराध यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...