agriculture news in Marathi, Officers neglect work of cropsap, Maharashtra | Agrowon

क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सध्या क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत डाटा भरण्याचे काम योग्य पद्धतीने होत आहे. त्या आधारेच राज्यात गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी उपाय योजना सुचविल्या जात आहेत. पूर्वी डाटा कमी प्रमाणात भरला जात होता. आता कृषी सहायकांची याकामी मदत घेतली जात असल्याने हे काम प्रभावीपणे होत असल्याचे चित्र आहे. 
- विजय कुमार, अपर मुख्य सचिव (कृषी)

नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन दिवस निरीक्षणाची जबाबदारी असलेल्या कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जात नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी हे काम महत्त्वाचे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र या कामाला ‘खो’ दिला जात आहे. 

क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत पूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत निरीक्षण नोंदविण्याचे काम होत होते. नंतर ॲपवर डाटा भरुन तो कृषी विभागाला कळविला जात होता. या माध्यमातून पिकाने नुकसान पातळी गाठली किंवा नाही याचा अंदाज घेत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ॲडव्हाझरीद्वारे उपाययोजना सुचवित त्याची अंमबजावणी होत होती.

कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत ही कामे होत असल्याने मुख्य प्रवाहातील मोठ्या संख्येने असलेले अधिकारी, कर्मचारी मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत होते. परिणामी, कृषी विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांऐवजी कृषी सहायकापासून ते विभागीय कृषी सहसंचालकापर्यंत साऱ्यांनाच क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत निरीक्षणाची जबाबदारी सोपविली. 

कृषी सहायकांना सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत निवडलेल्या दोन गावांपैकी एका गावातील दोन फिक्‍स प्लॉट, गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांतील एका दिवशी उर्वरित गावातील दोन प्लॉटमध्ये निरीक्षण घ्यावे, अशा सूचना आहेत. कृषी पर्यंवेक्षकांनादेखील याच पद्धतीने निरीक्षण घेण्याच्या सूचना आहेत. त्यानंतर असलेल्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक यांना
 ऐच्छीक पद्धतीने कोणत्याही प्लॉटला भेट देण्याचे स्वतंत्र आहे.
 
आठवड्यातील दोन दिवस भेट देऊन निरीक्षण घेत त्या नोंदी मोबाईलवर ॲपवर नोंदविणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारी ऐच्छीक कामाकडे कानाडोळा करीत असल्याचे वरिष्ठ कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या राज्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे निरीक्षणाकडे होणारे दुर्लक्ष गंभीर बाब ठरली आहे.

१२५० सर्व्हेक्षकांच्या जागी ८ हजारांवर कृषी सहायक
पूर्वी १२५० कंत्राटी कीड सर्व्हेक्षकांमार्फत क्रॉपसॅप प्रकल्पाचे कामकाज चालत होते. आता सुमारे ८ हजारांवर कृषी सहायक हे काम पार पाडतात. कृषी सहायकांकडून भरल्या जाणाऱ्या डाटाबाबत कृषी संशोधक संस्थास्तरावर संदिग्धता व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे या एका चांगल्या प्रकल्पाच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...