agriculture news in Marathi, Officers order to gave crop insurance within 7 days, Maharashtra | Agrowon

केळी उत्पादकांना विमा परतावा सात दिवसांत अदा करा : दिल्लीतून आदेश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पीकविमा योजनेसंबंधी आम्ही पुण्यातील बैठकीत सहभागी झालो. त्यात अनेक बॅंकांचे अधिकारी सहभागी झाले. योजनेचा लाभ सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांना कसा मिळेल, यावर चर्चा झाली. जो योजनेत सहभागी झाला, त्याला लाभ मिळालाच पाहिजे, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना येत्या सात दिवसांत निकष, पात्रता लक्षात घेऊन विमा परतावे (भरपाई) अदा करा. कोणताही विलंब त्यात करू नका. ज्यांची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर भरलेली नाही, अशा विमाधारक केळी उत्पादकांनाही तापमान, वेगाचे वारे यासंबंधीच्या नुकसानीची भरपाई अदा करा, असे आदेश दिल्ली येथील कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमा कंपनी व संबंधित यंत्रणेला पुणे येथे कृषी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत. 

ही बैठक मंगळवारी (ता.२१) सकाळी झाली. त्यात पंतप्रधान पीकविमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार भुतानी, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जळगाव जिल्ह्यातून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अग्रणी बॅंकेचे अधिकारी आदी सहभागी झाले.

फळ पीकविमा योजनेच्या त्रुटी व शेतकऱ्यांच्या तक्रारी आदी मुद्यांवर ॲग्रोवनने १२ ऑगस्टला मुख्य पानावर फळपीक विमा योजनेत कंपन्याच गब्बर, हे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालय, केंद्रीय कृषी संस्थांना इ मेलद्वारे तक्रार केली. तसेच विमा कंपनीकडेही आपल्या अडचणी सांगितल्या. यानंतर ही तातडीची बैठक पुुणे येथे झाल्याची माहिती मिळाली. 

जे शेतकरी योजनेत सहभागी झाले, त्यांची माहिती बॅंकांनी केंद्राच्या पोर्टलवर भरलेली नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर बॅंकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा झाली. यानंतर जर शेतकऱ्याने फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला असेल, पण त्याची माहिती पोर्टलवर भरलेली नसेल तरी संबंधित विमाधारकाला नियमानुसार भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. बॅंकांनी विमाधारकांची माहिती पोर्टलवर भरण्यास विलंब करू नये, अशी सूचना देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात या योजनेत सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना तापमान, वारा आदींमुळे नुकसानीसंबंधी येत्या सात दिवसात भरपाई दिली पाहीजे, अशा सूचनाही देण्यात आल्या. योजना शेतकरी केंद्रीत, सुलभ करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...