agriculture news in Marathi officers working in agriculture commissionrate after retirement Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘वतनदारी’ सेवानिवृत्तीनंतरही कायम ठेवण्यासाठी अधिकारी आता ‘कंत्राटी’ सुविधेचा सर्रास वापर सुरू झाला आहे. 

पुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘वतनदारी’ सेवानिवृत्तीनंतरही कायम ठेवण्यासाठी अधिकारी आता ‘कंत्राटी’ सुविधेचा सर्रास वापर सुरू झाला आहे. त्यामुळे कायमसेवेतील इतर चांगल्या अधिकाऱ्यांना संधी नाकारली जात असल्याचे सांगण्यात आले. 

राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा अभियान सांभाळण्यासाठी आयुक्तालयात तीन कृषी उपसंचालक असतानाही माजी उपसंचालक राम लोकरे यांना निवृत्तीनंतर तेथे कंत्राटी पध्दतीने पद बहाल केले गेले आहे. नैसर्गिक आपत्ती विभागात वर्षानुवर्षे ‘सुभा’ सांभाळणारे तंत्र अधिकारी आदिनाथ गायखे तसेच अतुल निंबारते यांनाही कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करून घेतल्याने कर्मचारी वर्गात नाराजी आहे.  
‘‘कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्याची वेळ येतेच कशी, यासाठी विस्तार,आस्थापना आणि आयुक्त कार्यालयांमधून कंत्राटी नियुक्तीच्या फायली पटापट कोण हलवतो, कंत्राटी सल्लागार नेमून कृषी खाते स्वतः असमर्थ असल्याची कबुली देत असल्याचे वाटत नाही काय,’’ असे विविध प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.  

आयुक्तालयातील कंत्राटी पध्दतीने वाटल्या जात असलेल्या ‘खिरापत केंद्राचे’ कामकाज सध्या मृद संधारण विभागातून चालत असल्याचा दावा कर्मचारी करीत आहेत. ‘‘वर्षानुवर्षे बदल्यांचे रॅकेट चालवणारा एक अधिकारी सध्या आयुक्तालय व मंत्रालयातील दुवा बनला आहे. हा अधिकारी कृषी खात्याचा अघोषित ‘सुपर कमिशनर’ असून तो राज्यात कोणाची कुठेही बदली करतो. कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात देखील हा अधिकारी पडद्याआड सूत्रे हलवतो,’’ अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, वर्षानुवर्षे आयुक्तालयात वेटोळे घालून बसलेल्या अधिकाऱ्यांबाबत राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे. ‘‘कृषी खात्यातील सोनेरी टोळी पध्दतशीरपणे आस्थापना विभाग आणि आयुक्तालयाला हाताशी धरते. नवा आयुक्त आला तरी आयुक्तालयातील पदांचे वाटप हीच टोळी करते. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांना आयुक्तालयात काम करण्याची इच्छा असूनही संधी दिली जात नाही,’’ असे मराठवाड्यातील एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले.

कंत्राटी वतनदारांचे पाठीराखे मंत्रालयात
आयुक्तालय व राज्यात इतर मोक्याच्या पदांवर बदल्या आणि नियुक्त्या करण्यात वाकबदार असलेल्या सोनेरी टोळीतील काही अधिकारी पध्दतशीरपणे मंत्रालय तसेच कृषिमंत्र्यांच्या कार्यालयात देखील घुसवले गेले आहेत. यामुळे कृषी आयुक्ताने किंवा कृषी सचिवाने एखाद्या प्रकरणात ठाम भूमिका घेतली तरी उपयोग होते नाही. सोनेरी टोळी गुप्तपणे मंत्रालयातूनच वरिष्ठांचे पंख छाटते. सुनील केंद्रेकर, बिजय कुमार, सच्चिंद्र प्रताप सिंह या सनदी अधिकाऱ्यांना याच दिव्यातून जावे लागले आहे. त्यामुळे खात्यात आल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांसमोर या टोळीशी जुळवून घेणे, दुर्लक्ष करणे किंवा बदलीची शिक्षा भोगणे, असे तीन पर्याय असतात, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...