agriculture news in Marathi, officials not aware regarding cash transactions, Maharashtra | Agrowon

शेतमालाच्या रोखीच्या व्यवहारांवर निर्बंधांविषयी अधिकारीच अनभिज्ञ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जुलै 2019

पुणे: बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी विक्री रोखीच्या व्यवहारांवर घालण्यात येणाऱ्या निर्बंधाबाबत पणन संचालनालय अनभिज्ञ असून, अडते, शेतकरीदेखील संभ्रमात आहेत; तर वर्षभरात शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांतील १ कोटींपेक्षा अधिकची रोख रक्कम बॅंक खात्यातून काढल्यास त्यास २ टक्के टीडीएस कपातीबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. या नियमाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार असल्याचे मध्य प्रदेश सरकारने जाहीर केले असले, तरी महाराष्ट्रातील अंमलबजावणीबाबत संभ्रमावस्था आहे.  

पुणे: बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी विक्री रोखीच्या व्यवहारांवर घालण्यात येणाऱ्या निर्बंधाबाबत पणन संचालनालय अनभिज्ञ असून, अडते, शेतकरीदेखील संभ्रमात आहेत; तर वर्षभरात शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांतील १ कोटींपेक्षा अधिकची रोख रक्कम बॅंक खात्यातून काढल्यास त्यास २ टक्के टीडीएस कपातीबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. या नियमाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार असल्याचे मध्य प्रदेश सरकारने जाहीर केले असले, तरी महाराष्ट्रातील अंमलबजावणीबाबत संभ्रमावस्था आहे.  

शेतमाल विक्री व्यवहारांतील काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल म्हणाले, की शेतमालाच्या आॅनलाइन लिलाव आणि व्यवहारांना केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी ई नाम योजनादेखील लागू करण्यात आली आहे. ही योजना रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठीच केलेली आहे. याची अंमलबजावणी विविध बाजार समित्यांमध्ये सुरू आहे. मात्र रोखीच्या व्यवहारांवरील विशिष्ट रकमेच्या निर्बंधाबांबत कोणत्या विभागाने कोणती कार्यवाही करावी, याबबत शासनाचे आदेश, सूचना अद्याप पणन संचालनालयाला प्राप्त झालेल्या नाहीत. 

बाजार समित्यांमध्ये हमाल, वाहनभाडे आदी 
विविध कारणांसाठी रोखीचे व्यवहार करावे लागतात. त्यामुळे हा नियम म्हणजे आमच्या नफ्यातील २ टक्के कमी करण्याचा प्रकार असून, हा नियम रद्द करावा, अशी मागणी अर्थसंकल्पानंतर लगेच केल्याचे ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...
अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक...
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...