agriculture news in Marathi, The officials started running the scope for the distribution of the drip | Agrowon

ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याचे अवघे बारा दिवस बाकी आहे. या वर्षात कृषी विभागाकडून पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेसाठी उपलब्ध झालेला निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहिले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पुणे विभागासाठी उपलब्ध झालेला ५९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. 

पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याचे अवघे बारा दिवस बाकी आहे. या वर्षात कृषी विभागाकडून पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेसाठी उपलब्ध झालेला निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहिले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पुणे विभागासाठी उपलब्ध झालेला ५९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. 

यंदा ठिंबक सिंचनासाठी पुणे विभागातून ४४ हजार ६५० अर्ज दाखल झाले आहेत. १५ मार्च ही अंतिम मुदत असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून पुणे विभागासाठी ५९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या आलेल्या अर्जापैकी ३२ हजार १९२ अर्जाची छाननी करण्यात आली आहे. तर ३१ हजार ९२१ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली असून आत्तापर्यंत २० हजार १७४ लाभार्थ्यांनी ठिंबक सिचनाचे संच बसविलेले आहे. तर ९ हजार ९८१ लाभार्थ्यांच्या संच बसविल्याची मोका तपासणी केली आहे. आतापर्यंत एकूण आठ हजार ८२ लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या सूचना देत अवघ्या सात हजार ५४३ लाभार्थ्यांना १४ कोटी ६० हजार रुपयांचे वाटप केले आहे. 

मागील वर्षी एक एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर कृषी विभागाकडे दाखल झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नसल्याचे चित्र होते. मात्र, चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याची वेळ एक ते दीड महिन्यावर येऊन ठेपल्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यास सुरवात झाली. दहा महिन्यात कृषी विभागाकडे उपलब्ध झालेल्या निधीपैकी अवघे ८६ लाख ९३ हजार रूपयांच्या अनुदानाचे वाटप शेतकऱ्यांना झाले होते.

ठिंबक सिंचनासाठी जिल्हानिहाय खर्च झालेला निधी ः 
जिल्हा  आलेले अर्ज   अनुदान दिलेले शेतकरी संख्या  रक्कम 
नगर २२,५८७ ३,२११ ५ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये 
पुणे  ९८६६  १८७८  ४ कोटी ४१ लाख ६० हजार 
सोलापूर १२,१९७  २४५४  ४ कोटी ७६ लाख ९३ हजार रुपये 
एकूण ४४, ६५० ७५४३ १४ कोटी ६० लाख रुपये

 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...