खत परवान्याची ऑफलाइन अर्ज पद्धत अखेर बंद होणार

गैरव्यवहाराला चालना देणारी खताची जिल्हा पातळीवरील ऑफलाइन परवाना पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
The offline application method for fertilizer license will eventually be discontinued
The offline application method for fertilizer license will eventually be discontinued

पुणे ः गैरव्यवहाराला चालना देणारी खताची जिल्हा पातळीवरील ऑफलाइन परवाना पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाने खत उत्पादनाची विक्री परवाना दुरुस्ती व परवाना नूतनीकरण अर्ज प्रक्रियेची सुधारित नियमावली जारी केली आहे. ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर अर्ज दाखल केल्यानंतर राज्यस्तरावरून देण्यात येणारे परवाने जारी केले जातात. आता या प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराचे पाळेमुळे परवाना वितरण प्रणालीत असल्याचे ‘अॅग्रोवन’च्या वृत्तमालिकांमधून यापूर्वी उघडकीस आणले गेले होते.

‘‘राज्यस्तरीय परवाना पद्धत पूर्णतः नव्या प्रणालीवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील सध्याची खतविषयक ई-परवाना प्रणाली बंद केली जाईल,’’ असे गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी एका पत्रात नमूद केले आहे. 

कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘जिल्हास्तरीय खत परवाना पद्धत चालू महिन्यापासूनच ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरून हाताळण्याचे नियोजन आहे. परवान्यातील दुरुस्तीसाठी राज्यस्तरावरून घेतले जाणारे ऑफलाइन अर्ज घेण्याची पद्धत बंद केली जाणार आहे. त्यामुळे परवान्यामध्ये दुरुस्ती करायची असल्यास संबंधित परवानाधारक उद्योजकांना नव्या प्रणालीत सामील होत नवा परवाना क्रमांक मिळवावा लागणार आहे.’’

दरम्यान, कृषी उद्योजकांच्या म्हणण्यानुसार  कृषी विभागाने अजूनही परिपूर्ण पारदर्शकता आणलेली नाही. आपले सरकार संकेतस्थळाचा वापर वाढावा यासाठी काही सुधारणा केल्या जात आहेत. मात्र, या सुधारणा थातूरमातूर स्वरूपाच्या ठरत आहेत. ‘‘परवान्यांची सर्व कामे ऑनलाइन करणे, त्यात कालबद्ध प्रणाली आणणे व अर्ज करण्यापासून ते परवान्याची डिजिटल स्वाक्षरीसहीत प्रत उद्योजकाच्या हातात पडणे ही पारदर्शक प्रणाली अद्यापही स्वीकारण्यात आलेली नाही,’’ अशी माहिती एका उद्योजकाने दिली. 

  • ऑफलाइन पद्धत ३० सप्टेंबरपासून कायमची बंद
  • गैरव्यवहाराची पाळेमुळे असलेली परवाना वितरण पद्धत बदलणार
  • नव्या प्रणालीत सामील होत नवा परवाना क्रमांक मिळवावा लागणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com