agriculture news in Marathi oil seeds production increased in world Maharashtra | Page 5 ||| Agrowon

तेलबिया उत्पादनात वाढ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 मार्च 2021

जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत ५९५.१ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज होता. 

वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत ५९५.१ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज होता. तर मार्च महिन्यात ५९५.८ दशलक्ष टन तेलबिया उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तविली आहे. भारत सरकारच्या सुधारित अंदाजाच्या आधारे भारतात तेलबिया उत्पादन २ लाख टनांनी वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

मार्च महिन्यात ‘यूएसडीए’ने तेलबिया उत्पादन, निर्यात आणि शिल्लक साठ्यात वाढ झाल्याचे म्हटले आहे. जागतिक उत्पादन ५९५.१ दशलक्ष टनांवरून ५९५.८ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. तेलबियांमध्ये सोयाबीन आणि मोहरी उत्पादनात वाढ होणार असल्याचे म्हटले आहे, तर पाम कार्नेल, सरकी आणि सूर्यफूल पिकाच्या उत्पादनात काहीशी स्थिती नकारात्मक आहे. ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन १० लाख टनांनी वाढून १३४ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. तर भारतात सोयाबीन उत्पादन २ लाख टनांनी वाढून १०.७ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजातील लागवड क्षेत्राच्या आधारे उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

निर्यातीत वाढ 
जागतिक तेलबिया निर्यातीत ८ लाख टनांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने युक्रेन आणि ऑस्ट्रेलियातून मोहरीची निर्यात वाढली आहे. युरोपियन देश आणि युनायटेड किंगडम या देशांत मोहरी उत्पादन वाढून १७.१ दशलक्ष टनांवर आले असतानाही मोहरी आयात वाढली आहे. तर सोयाबीन गाळपात १६ लाख टनांनी वाढ होऊन ३२३.६ दशलक्ष टनांवर गेले आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये सोयाबीन गाळप वाढले आहे, तर चीनमध्ये घटले आहे. अर्जेंटिनाची तेल आणि सोयामिल निर्यातही वाढली आहे. चीनमध्ये सोयाबीन गाळप १० लाख टनांनी कमी होऊन ९८ दशलक्ष टन झाले आहे. 

अमेरिकेत सोयाबीन साठ्यात घट 
अमेरिकेचा सोयाबीन पुरवठा आणि वापर मार्च महिन्यात कायम ठेवण्यात आला आहे. अमेरिकेत सोयाबीन गाळप हे २२० कोटी बुशेल्स आणि निर्यात २२५ कोटी बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. तर शिल्लक साठा १२० दशलक्ष बुशेल्स राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ४०५ दशलक्ष बुशेल्स शिल्लक साठा होता. अमेरिकेत हंगामातील सरासरी सोयाबीन दर ११.१५ डॉलर प्रतिबुशेल्स राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर सोयामिल दर मागील महिन्याएवढेच म्हणजेच ४०० डॉलर प्रतिटन राहील. तर सोयातेलाचे दर ४१.० सेंट प्रतिपाउंड राहतील, गेल्या महिन्याच्या तुलनेत हा दर १ सेंटने अधिक आहे. 

तेलबिया दृष्टिक्षेपात 

  • जागतिक उत्पादनात ७ लाख टनांनी वाढ 
  • सोयाबीन, मोहरी उत्पादनात वाढ शक्य 
  • पाम कार्नेल, सरकी, सूर्यफूल उत्पादनाला फटका शक्य 
  • जागतिक तेलबिया निर्यात वाढली 
  • चीनमध्ये सोयाबीन गाळप घटले 

इतर अॅग्रोमनी
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...