तेलबियांच्या क्षेत्रात घटीचा कल कायम

एकेकाळी तेलबियांचे भरघोस उत्पादन घेण्याऱ्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून तेलबियांच्या क्षेत्रात वरेचवर घट होत आहे. यंदा रब्बीची पेरणी बऱ्यापैकी झालेली असली तरी तेलबियांच्या क्षेत्रात यंदाही कमालीची घट झाली आहे.
Oilseeds continue to decline
Oilseeds continue to decline

नगर ः एकेकाळी तेलबियांचे भरघोस उत्पादन घेण्याऱ्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून तेलबियांच्या क्षेत्रात वरेचवर घट होत आहे. यंदा रब्बीची पेरणी बऱ्यापैकी झालेली असली तरी तेलबियांच्या क्षेत्रात यंदाही कमालीची घट झाली आहे. क्षेत्र घटत असल्याने कृषी विभागाकडूनही सरासरी क्षेत्रात घट होत आहे. यंदा आतापर्यंत राज्यात सरासरीच्या नऊ टक्के म्हणजे केवळ ६ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात तेलबियांच्या होणारी घट चिंता व्यक्त करणारी आहे.  राज्यात रब्बी हंगामासाठी सरासरी ५१ लाख १९ हजार, ८९८ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्‍चित केलेले आहे. यंदा आतापर्यंत १३ लाख ८३ हजार ९८६ हेक्टरवर म्हणजे २७ टक्के पेरणी झाली आहे.   गेल्या वर्षी आतापर्यंत १७ लाख २६ हजार ६०८ हेक्टवर पेरणी झाली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात तेलबियांचे ८९ हजार २२७ हक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा ६ हजार ५९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत ९ हजार ८११ हेक्टरवर पेरणी झाली होती.  राज्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कडधान्याची पेरणीच होत नाही. तर नंदुरबार, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, हिंगोली जिल्ह्यांत यंदा पेरणी झाली नाही. करडईची जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, वर्धा, नागपूर, भंडारा, बुलडाणा, वाशीम, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत. तिळाची ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर, सातारा, परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यांत. जवसाची सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर जिल्ह्यांत, तर सूर्यफुलाची पालघर, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत परणी झाल्याचे अहवालात नमूद असले, तरी पेरणी क्षेत्र अत्यल्प आहे. 

लातूर, उस्मानाबादमध्ये चांगले क्षेत्र  राज्यात तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट होत असताना लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १३३६ हेक्टरवर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ११२८ हेक्टवर पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यांत लागवडीखालील क्षेत्र समाधानकारक असले, तरी तेलबियांचे सातत्याने घटते क्षेत्र चिंताजनक आहे.  कृषी विभागाचे प्रयत्न काय?  तेलबियांचे घटते क्षेत्र पाहता हे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्यात जामखेड, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर या तालुक्यांत तेलिबियांची रब्बीत पेरणी चांगल्या प्रकारे व्हायची. आता क्षेत्र कमी होत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून क्षेत्र वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. तेलबियांच्या घटत्या क्षेत्रावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत साधी चर्चाही केल्याचे दिसत नाही.

राज्यातील रब्बीतील पेरणी क्षेत्र  (कंसात सरासरी क्षेत्र) हेक्टर      करडई ः ४४५१ (४६ हजार ४६५) ः १० टक्के      जवस ः ७९० (१६ हजार ६८९ ) ः ५ टक्के      तीळ ः ६० (१६३०) ः ४ टक्के      सूर्यफूल ः ४२२ (१४४१६) ३ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com