परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २३) भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

कारल्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये दर मिळाले.  पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक झाली.

प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले.

वांग्याची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट २०० ते ३५० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

फ्लॅावरची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. कोबीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यामध्ये बीट रुटची ३ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा ३५० ते ५०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com