Agriculture news in marathi okra 2500 to 3000 rupees per quintal in Parbhani | Agrowon

परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ७) भेंडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ७००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ७) भेंडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ७००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

गवारीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. वालाची १५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकड्याला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले.

शेपुची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १५० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ४०० ते १००० रुपये दर मिळाले. 

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १५ क्विंटल आवक, तर दर ८०० ते १२०० रुपये मिळाले. वांग्यांची ४५ क्विंटल आवक झाली. दर १२०० ते २५०० रुपये मिळाले.

टोमॅटोची २००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ५० ते ८० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक झाली. तिला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. 

पेरूला १००० ते १५०० रुपये दर

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्यांची ८ हजार नग आवक होऊन शेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची ४०० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. पेरूची २० क्विंटल आवक झाली. तर दर प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...