Agriculture news in marathi, Okra in Aurangabad, Rs. 1000 to Rs 4000 rupee per quintal | Agrowon

औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १०) भेंडीची ५५ क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १०) भेंडीची ५५ क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची २४७ क्‍विंटल आवक झाली. तिचे दर १३०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५६ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १७८ क्‍विंटल, तर दर ८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. गवारची आवक १४ क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीचे दर १३०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३५ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

काकडीची आवक ४४ क्‍विंटल, तर दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कारल्याची आवक २७ क्‍विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक ८७ क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ५१ क्‍विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

भूईमुग शेंगांची आवक १५ क्‍विंटल, तर दर ४३०० ते ६८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या काशिफळाला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

कच्च्या खजूरची आवक ११ क्‍विंटल, तर दर १५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८०० ते १००० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ९९०० जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकड्याचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...