Agriculture news in Marathi Okra, Gawari prices improve in Pune | Page 3 ||| Agrowon

पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 जून 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ६) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाचे सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्याने काही प्रमाणात हॉटेल सुरू झाल्याने भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली होती.

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ६) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाचे सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्याने काही प्रमाणात हॉटेल सुरू झाल्याने भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली होती. आवक सरासरी आणि मागणी तुलनेने वाढल्याने भेंडी, गवार, दोडका, कारली, वांगी, सिमला मिरची, शेवगा यांच्या दरात वाढ झाली होती.

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून ३ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ७०० पोती आवक झाली होती. तर भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, काकडी ६ टेम्पो, कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ८, सिमला मिरची ७ टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, भुईमूग शेंगा ४० गोणी, तांबडा भोपळा ७ टेम्पो, गावरान कैरी ३ टेम्पो, तर कांदा ३० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १५०-२००, बटाटा : १००-१६०, लसूण : ५००-८००, आले : सातारी १५०-१८०, भेंडी : २५०-३५०, गवार : ३५०-४५०, टोमॅटो : ६०-१००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : १५०-२००, काकडी : १५०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ७०-१००, वांगी : ३००-४५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ३५०-४००, गाजर : १००- १५० वालवर : ३००-३५०, बीट : १२०-१५०, घेवडा : ६००-८००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १६०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार - ५००-७००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, तोतापुरी कैरी - १८०-२२०, गावरान - १००-१५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या पावणेदोन लाख, तर मेथीच्या ८० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - ५००-१२००, मेथी -७००-१२००, शेपू ७००-१०००, कांदापात १०००-१८००, चाकवत -७००-१०००, करडई ४००-६००, पुदिना १००-२००, अंबाडी - ३००-६००, मुळे - ८००-१०००, राजगिरा - ३००-४००, चुका ५००-६००, चवळई - ३००-४००, पालक ५००-८००. 

फळबाजार
पळ बाजारात रविवारी (ता. ६) लिंबांची सुमारे २ हजार गोण्या, डाळिंबाची ४० टन, मोसंबी ५ टन, संत्रा १ टन, पपई २५ टेम्पो, चिकू ५०० गोणी, पेरू १५० क्रेट, कलिंगड २५ टेम्पो, खरबूज १० टेम्पो, सीताफळ ३०० किलो, स्थानिक हापूस, रायवळ आणि पायरी आंब्याची सुमारे ९० डाग आवक झाली होती. तर कर्नाटक मधून विविध वाणांच्या आंब्याची सुमारे दीड हजार पेटी आवक झाली होती.  लिंबे (गोण) - १००-३००, डाळिंब (प्रति किलो) गणेश - १०-२५, आरक्ता -१०-४०, भगवा -२५-१००, मोसंबी (३ डझन) २००-६०० (४ डझन) ८०-१००, मोसंबी (१०किलो) ३००-१२००, पपई (किलो) ५-१५, कलिंगड -३-८, खरबूज -५-१२, सीताफळ - २०-१५०,  पेरू (२० किलो) - १५०-२५०, स्थानिक आंबा हापूस (डझन) - २००-३५०, रायवळ ५०-७०, पायरी -१००-२००, कर्नाटक आंबे - हापूस (३ ते ५ डझन) १००-१६००, पायरी (४-५ डझन) - ५००-८००, लालबाग (प्रति किलो) - २०-३०, बदाम - १५-२५, तोतापुरी - २०-३०, मल्लिका - ३०-४०.

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ६) खोल समुद्रातील मासळीची १० टन, खाडीची सुमारे २०० किलो, तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमार १५ टन आवक झाली होती. अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. देशातील आंध्र प्रदेश, हावडा, मद्रास किनारपट्टीवरून शहरातील बाजारात मासळीची आवक बंद आहे. रत्नागिरी, गुजरात, मुंबई येथून अत्यल्प प्रमाणात मासळी दाखल होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मासळीच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पापलेट, सुरमई, कोळंबी, बोंबील, हलवा, रावस यांच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. तमिळनाडू ते हावडा येथून मासळीची आवक सुरू झाल्यानंतर दरात घट होण्याचा अंदाज व्यापारी वर्तवीत आहेत. मागणी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनचे दर प्रतिकिलो मागे १० रुपयांनी वधारले आहेत. इंग्लिश अंड्याच्या दरातील तेजी कायम असून, आवक जावक कायम असल्याने मटणसह, अंडीचे दर स्थिर होते. अशी माहिती चिकन, अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)
 पापलेट : मोठे १८००-२०००, मध्यम : १२००-१५००, लहान ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ८००-१०००, सुरमई : ८००-१४००, रावस : ल७५०-१२००, घोळ : ८००, पाला :  लहान १२००-१४००, वाम : पिवळी १०००, काळी ५००-६००, ओले बोंबील : १६०-२००.
कोळंबी : लहान २८०-३२०, मोठे ४४०-४८०, जंबो प्रॉन्स : १२००-१४००, किंग प्रॉन्स : ७५००, लॉबस्टर : १४००, खेकडे : २८०-३२०, चिंबोऱ्या : ६००. 
खाडीची मासळी : तांबोशी : ४८०, लेपा : २४०, शेवटे : २८०, बांगडा : २८० -३२०, तिसऱ्या : २०० ते २४०,  खुबे : १२०-१६०,
नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : ४००-४८०, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १००-१२०, खेकडे : २००-२८०, वाम : ६००. 
चिकन : चिकन : २००, लेगपीस : २४०, जिवंत कोंबडी : १६०, बोनलेस : २८०. 
अंडी : गावरान : शेकडा : ८५० डझन : १०८, प्रतिनग : ९, इंग्लिश : शेकडा : ५६५, डझन : ७८ प्रतिनग : ६.५०. 
मटण : बोकडाचे : ७००, बोल्हाईचे : ७०० खिमा : ७००, कलेजी : ७४०.


इतर ताज्या घडामोडी
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...