नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये भेंडी २५०५ रुपये क्विंंटल
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडीची आवक अवघी ४५ क्विंंटल झाली. तिला २०८५ ते २९१५ दर होता. सर्वसाधारण दर २५०५ राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडीची आवक अवघी ४५ क्विंंटल झाली. तिला २०८५ ते २९१५ दर होता. सर्वसाधारण दर २५०५ राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजारात वांग्यांची २९० क्विंंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंंटल १५०० ते ३००० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २२५० राहिला. फ्लॉवरची आवक ३६० क्विंंटल झाली. त्यास प्रतिक्विंंटल २८५ ते ६४५ दर मिळाला. कोबीची आवक ९१५ क्विंंटल झाली. तिला सर्वसाधारण ८३५ ते १६७०, तर सर्वसाधारण दर १२५० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १३९ क्विंंटल झाली. त्यास २५०० ते ३२५०, तर सरासरी दर ३००० राहिला
. लिंबूची आवक ५३ क्विंंटल झाली. त्यास ६२५ ते १५००, तर सरासरी दर १४०० राहिला. हिरव्या मिरचीची आवक १९ क्विंंटल झाली. तिला २००० ते ३००० दर होता.
उन्हाळ कांद्याची आवक १८३ क्विंंटल झाली. त्यास १७५० ते ३३०० दर होता. सर्वसाधारण दर २९५० राहिला. लाल कांद्याची आवक ७८९ क्विंंटल झाली. त्यास १५०० ते ४०००, तर सरासरी दर ३२०० राहिला. बटाट्याची आवक ८८५ क्विंंटल झाली. त्यास २७३० ते ४०००, तर सरासरी दर ३६५० राहिला. लसणाची आवक २८ क्विंंटल झाली. दर ६१५० ते १२५०० होता.
फळांमध्ये मोसंबीची आवक ६० क्विंंटल झाली. तिला २००० ते ५०००, तर सरासरी दर ४००० रूपये होता. चिकुची आवक १४ क्विंंटल झाली. त्यास २५०० ते ४५००, तर सरासरी दर ३५०० राहिला. केळीची आवक १३० क्विंंटल झाली. तिला ४०० ते १००० दर होता. पपईची आवक ७० क्विंंटल झाली. तिला ६०० ते १५००, तर सरासरी दर १२०० राहिला.
वेलवर्गीय भाज्यांचे दर टिकून
भोपळ्याची आवक १३२५ क्विंंटल होती. त्यास २६५ ते ६६५, तर सरासरी दर ४३५ राहिला. कारल्याची आवक ३२८ क्विंंटल झाली. त्यास १६७० ते २५०५, सरासरी दर २०८५ राहिला. दोडक्याची आवक १३७ क्विंंटल झाली. त्यास १६७० ते ४१६५, तर सरासरी दर २९१५ राहिला. गिलक्याची आवक ९१ क्विंंटल होती. त्यास १६७० ते २९१५, तर सरासरी २१८५ राहिला.
- 1 of 65
- ››