परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१८) भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
Okra in Parbhani costs Rs. 1000 to 1500 per quintal
Okra in Parbhani costs Rs. 1000 to 1500 per quintal
   परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१८) भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.     पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपुची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले.     कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.    काकडीची १२५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले. काशिफळांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची (देवडागंर) १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १०००  ते २००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १५००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले.टोमॅटोची २००० क्रेट आवक झाली.     प्रतिक्रेटला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोबीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये मिळाले.  

लिंबांना १५०० ते २५०० रूपये 

लिंबांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. बीटरुटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगां (ओल्या) ची ६० क्विंटल आवाक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. मक्याची १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com