परभणीत भेंडी २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत भेंडी २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत भेंडी २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १५) भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ५००० ते ७००० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. काकडीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. चुक्याची ४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६००० ते १२००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्रेट आवक झाली. प्रतिक्रेटला २५० ते ४०० रुपये रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रुटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. 

पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगाची २० क्विंटल आवक होती. त्यांना प्रतिक्विंटल ४००० ते ५५०० रुपये दर मिळाले. मक्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२००ते १५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com