राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१८) भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. या भेंडीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी २ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
Okra in the state is Rs. 600 to 4500 per quintal
Okra in the state is Rs. 600 to 4500 per quintal

औरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये  

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१८) भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. या भेंडीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी २ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ नोव्हेंबरला २२ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल होते. १३ नोव्हेंबरला १४ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. १४ नोव्हेंबरला १४ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २८०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. 

१५ नोव्हेंबरला १८ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. १६ नोव्हेंबरला १७ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. १७ नोव्हेंबरला २० क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला होता, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सांगलीत क्विंटलला १५०० ते २००० रुपये

सांगली ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. १८) भेंडीची ६० ते ७० बॅग (एक बॅक १० ते १५ किलोची) आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत सांगली जिल्ह्यातील आष्टा, वाळवा, तुंग, मिरज, कसबेडिग्रज, यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कोथळी या भागातून भेंडीची आवक होते. बुधवारी (ता. १७) भेंडी ४० ते ५० बॅगेची आवक झाली होती. भेंडीस प्रति दहा किलोस १८० ते २५० रुपये असा दर होता.  मंगळवारी (ता. १६) भेंडीची ५० ते ६० बॅगेची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १५० ते २१० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १५) भेंडीची ५० ते ६० बॅगांची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १५० ते २१० रुपये असा दर मिळाला.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भेंडीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.भेंडीच्या आवकेत थोडी घट झाली आहे. दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये क्विंटलला २५०० ते ४२०० रुपये

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१७) भेंडीची आवक ६२ क्विंटल झाली. तिला क्विंटलला किमान २५०० कमाल ४२०० रुपये दर होते. तर सरासरी दर ३४०० रुपये मिळाला. सध्या आवक कमी असल्याने दर टिकून असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

बाजार समिती आवारात सध्या आवक कमी आहे. तर मागील सप्ताहाच्या तुलनेत मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात सुधारणा दिसून येत आहे. मंगळवारी (ता.१६) भेंडीची आवक ५१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होता. सोमवारी (ता.१५) आवक ४४ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ६००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये होता.रविवारी (ता.१५) आवक ४९ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल १६६० ते ३७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २९१० रुपये होता.

शनिवारी (ता.१३) आवक ४५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १६६० ते ३३३० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये होता. शुक्रवारी (ता.१२)आवक ४२ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल २०८५ ते ३९२० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २९२० रुपये होता. गुरुवारी (ता.११) आवक ४७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १६६० ते ३३३० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये होता.

सोलापुरात क्विंटलला ६०० ते ४००० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगला उठाव मिळाला. भेंडीचे दरही टिकून राहिले. भेंडीला प्रतिक्विटंलला सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीची आवक रोज १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. मागणीच्या तुलनेत आवकेचे प्रमाण कमीच होते. पण भेंडीला उठाव असल्याने दरही टिकून राहिले. प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही भेंडीची आवक अशीच ५ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. तर, भेंडीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. त्या आधीही आवकेचे प्रमाण असेच राहिले. तर दर प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी २५००  रुपये आणि सर्वाधिक ३८०० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

जळगावात क्विंटलला १६०० ते २६०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१८) भेंडीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये मिळाला. आवक चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर, यावल आदी भागातून होत आहे. दरात गेल्या महिनाभरात वाढ झाली असून, दर टिकून आहेत. 

नगरमध्ये क्विंटलला १५०० ते ४५०० रुपये  नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडीची दर दिवसाला ३५ ते ४० क्विंटलची आवक होत आहे. गुरुवारी (ता.१८) भेंडीला १५०० ते ४५०० व सरासरी ३००० रुपयांचा दर मिळाला आहे. 

बाजार समितीत भेंडीच्या आवकेत सतत चढउतार होत आहे. १५ नोव्हेंबर रोजी २६ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते पाच हजार व सरासरी तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला. १३ नोव्हेंबर रोजी ४२ क्विंटलची आवक होऊन २५०० ते ४५०० व सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. 

१२ नोव्हेंबर रोजी ४६ क्विंटलची आवक होऊन ३४०० ते ४००० व सरासरी ३७०० रुपयांचा दर मिळाला. ९ नोव्हेंबर रोजी ४५ क्विंटलची आवक झाली. दर २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीमधून सांगण्यात आले.

परभणीत क्विंटलला १५०० ते २५०० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१८) भेंडीची ३० क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५०० रुपये, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये परभणी तालुक्यातील सिंगणापूर, बोरवंड, आर्वी,पेडगाव आदी गावातील तसेच जिंतूर, पूर्णा तालुक्यातील गावातील शेतकरी भेंडी विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी भेंडीची १५ ते ३० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटलला १५०० ते ४००० रुपये दर मिळाले. 

गुरुवारी (ता.१८) भेंडीची ३० क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक दर प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com