agriculture news in Marathi, old milk rate from mother dairy, Maharashtra | Agrowon

मदर डेअरीकडून जुन्या दरानेच दूध खरेदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बुलडाणा ः शासनाने आदेश दिल्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक अाॅगस्टपासून राज्यात होत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीकडून जुनेच दर मिळत असल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले अाहे. मदर डेअरीकडून बुलडाणा जिल्ह्यात १२ हजार लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होत अाहे.

बुलडाणा ः शासनाने आदेश दिल्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक अाॅगस्टपासून राज्यात होत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीकडून जुनेच दर मिळत असल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले अाहे. मदर डेअरीकडून बुलडाणा जिल्ह्यात १२ हजार लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होत अाहे.

जिल्ह्यात मोताळा, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये ‘मदर’ डेअरीचे अधिक संकलन अाहे. डेअरीकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे दिले जातात. शासनाने नुकतीच दूध दरवाढ केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. मात्र मदर डेअरीकडून अद्याप या दरवाढीची अंमलबजावणी केली जात नसल्याने दूध उत्पादक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अाहेत.

या जिल्ह्यात इतर डेअरींकडूनही हजारो लिटर दूध खरेदी केले जाते; मात्र त्यांच्याकडून अाधीच चांगले दर दिले जात अाहेत. केवळ मदर डेअरीचा दर हा फॅट ३.५ व ८.४ एसएनएफसाठी २१ रुपये ७० पैसे इतका दिला जात आहे. परिणामी हजारो दूध उत्पादक शेतकरी शासनाने केलेल्या भाववाढीपासून दूरच असल्याची बाबही या निमित्ताने पुढे अाली अाहे.   

दूध उत्पादन करणे कठीण झाल्याने शासनाने दरवाढ करावी, अशी मागणी उत्पादकांमधून सातत्याने होत होती. त्याला न्याय मिळाला असून, पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ जाहीर झाले अाहेत. हे दर जाहीर करीत अंमलबजावणीचे अादेश देण्यात अाले.

पत्राची प्रतीक्षा
मदर डेअरीकडून सुधारित दर न देण्याबाबत चौकशी केली असता, अद्याप अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात अाले. शासनाने दरवाढ देण्याबाबत जो अादेश दिला, त्यात काही अटी असून, त्यांची तपासणी करून नंतरच त्याबाबत दरवाढीचा निर्णय डेअरीच्या वरिष्ठ स्तरावरून घेतला जाईल, असे सांगण्यात अाले. या डेअरीचे दर हे वरिष्ठ पातळीवर ठरविले जातात. स्थानिक स्तरावर काम करणाऱ्यांना त्याबाबत कुठहीली अधिकृत माहिती देता येत नाही, असेही संबंधितांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिली. 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...