जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत नेणार ः कृषीमंत्री दादा भुसे

Old varieties seeds will be taken to farmers in the state: Agriculture Minister Dada Bhus
Old varieties seeds will be taken to farmers in the state: Agriculture Minister Dada Bhus

नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली आहे. ते काम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभाग सहकार्य करील. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या स्थानिक वाणांच्या संवर्धनाला चालना देतानाच त्याच्या बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करेल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.  

‘शेतकऱ्यांसाठी लाखमोलाचे काम करणाऱ्या राहीबाईंची भेट घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव गाठले. देशभर ‘सीडमदर’ म्हणून ओळख बनलेल्या राहीबाईंना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्याबद्दल या कृषिमातेचा साडी चोळी देऊन कृषिमंत्र्यांनी सत्कार केला. राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांच्याकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते, ते मूळ स्वरूपात आहे. त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचत गट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. राहीबाईंनी भाजीपाला, भात, गहू, बाजरी, कडधान्ये पिकांच्या ११२ प्रकारचे वाण जतन केले. ही अभिमानाची बाब आहे.

आईची आठवण झाली ‘माझी माय पण मातीच्या भांड्यात बियाणे साठवूण ठेवायची. तुमचं काम पाहून मला आईची आठवण झाली’, अशी भावना राज्याचे कृषीमंत्री भुसे यांनी ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्याजवळ व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com