अकोल्यात जुन्या भाजीबाजारात लागली आग

अकोल्यात जुन्या भाजीबाजारात लागली आग
अकोल्यात जुन्या भाजीबाजारात लागली आग

अकोला  ः शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जैन मंदिराजवळील भाजीबाजाराला मंगळवारी (ता. ११) पहाटे भीषण आग लागली. या आगीत १५ ते २० दुकाने जळून खाक झाल्याचे समोर आले. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. शहरातील मध्यवस्तीत भरणाऱ्या या भाजी बाजारातील दुकानांना पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत भाजीपाला, मिरची, कांदे, बटाटे, विविध फळे, देवपूजेचे साहित्य जळून खाक झाले. आगीच्या या घटनेमुळे या छोट्या भाजी बाजारातील विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आटोक्यात येत नसल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com