नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर
अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने व कर्जबाजारीपणा वाढत असल्याने तालुक्यातील हराळ येथील शेतकरी भीमराव विक्रम बिल्लारी यांनी दीड एकरांतील डाळिंब बाग जेसीबीने उखडून टाकली.
रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने व कर्जबाजारीपणा वाढत असल्याने तालुक्यातील हराळ येथील शेतकरी भीमराव विक्रम बिल्लारी यांनी दीड एकरांतील डाळिंब बाग जेसीबीने उखडून टाकली.
भीमराव बिल्लारी यांच्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर त्यांनी सहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. सुरुवातीला दोन वर्षे बऱ्यापैकी उत्पादन झाले. परंतु मागील काही वर्षांपासून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यातच कर्जाचा डोंगर वाढला. दीड एकरांवर फळबाग असल्यामुळे इतर पिके घेता येत नव्हती व बागेपासूनही काहीच उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे चार वर्षांतच कर्ज वाढत गेले.
शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग लागवडीकरीता दिले जाणारे अनुदानही मिळाले नाही. डाळिंब लागवडीपासून तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे बिल्लारी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत गेली. शेवटी त्यांनी डाळिंबाची झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. दीड एकरांतील झाडे जेसीबीच्या साह्याने उपटून टाकली.
प्रतिक्रिया
माझ्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. परंतु उत्पन्न झाले नाही. तसेच कृषी खात्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाचे अनुदानही मिळाले नाही. कर्ज वाढल्याने शेवटी ही बाग काढावी लागली.
-भीमराव विक्रम बिल्लारी, शेतकरी हराळ ता. रिसोड, जि. वाशीम
- 1 of 1096
- ››