Agriculture news in marathi One and a half lakh due to lack of rain Planting per hectare was dug | Page 2 ||| Agrowon

गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍टरवरील धान लावणी खोळंबली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

 देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन महिने झाले असतानाच जिल्ह्यात पावसाने अवघे दोन दिवस हजेरी लावली. या दोन दिवसांतच पावसाने सरासरी गाठल्याने  रोवणीच्या (लावणी) कामाला वेग आला आहे.

गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन महिने झाले असतानाच जिल्ह्यात पावसाने अवघे दोन दिवस हजेरी लावली. या दोन दिवसांतच पावसाने सरासरी गाठल्याने धान (भात) रोवणीच्या (लावणी) कामाला वेग आला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मॉन्सूनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे प्रभावित झाली होती. सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्ये  सुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहेत. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५१४ मिमी पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ४६४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद झाली आहे. दहा टक्के पावसाची तूट अजूनही कायम आहे.

जुलै महिना संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. तर ऑगस्ट महिन्यापासून पाऊस कमी होतो. यंदा आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच रोवण्या झाल्या आहेत. तर सत्तर टक्के रोवण्या शिल्लक आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांच्या रोवण्या आटोपल्या आहेत. पण वर थेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी २४ जुलैपर्यंत ५५ हजार हेक्टरवर धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. अजून १ लाख २६ हजार हेक्टरवरील रोवणी होणे शिल्लक आहे. त्यामुळे रोवणीला वेग घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

गडचिरोलीत सहा हजार
हेक्‍टरवर धान लागवड 

गडचिरोली : कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सहा हजार हेक्‍टरवर धान रोवणी (लावणी) झाली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने धान रोवणी सुरू असली तरी शेतकऱ्यांची अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

यावर्षी खरीप हंगामात सुमारे १ लाख ६८ हजार हेक्‍टरवर धानाची लागवड अपेक्षीत आहे. धान रोवणीसाठी ११ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहेत. रोवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षीत पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागत आहे, सोबतच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशांनीच रोवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे केवळ सहा हजार हेक्‍टर क्षेत्रावरच रोवणीची कामे आटोपली आहेत. आता काही दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने रोवणीचे काम वेगात आले आहे. सिरोंचा तालुक्‍यात या वर्षी उशिरा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी पऱ्हे टाकत आहे. त्यामुळे धान रोवणीच्या कामाला सुरुवात होण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी 
लागण्याची शक्‍यता आहे. या तालुक्‍यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पावसाच्या सुरुवात शेतकरी कापसाच्या लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येतात.

 खर्च कमी करण्यासाठी ‘आवत्या’
धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची रोवणी करतात. या वर्षी सुमारे १५ हजार ७९१ हेक्‍टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे. आवत्या बरोबरच काही शेतकऱ्यांनी या वर्षीपासून धानाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गडचिरोली तालुक्‍यात ३ हजार २६९, कुरखेडा ४७६, आरमोरी ४ हजार १०४, चामोर्शी ५५३, धानोरा ३ हजार ८९, कोरची १ हजार, देसाईगंज १ हजार २१७, मुलचेरा १५९, भामरागड ३९८ हेक्‍टर या प्रमाणे आवत्याची लागवड करण्यात आली आहे..

भंडाऱ्यात फक्त २५ टक्के भात लावणी
भंडारा : संपूर्ण राज्यात पावसाने दाणादाण उडविली असताना भंडारा जिल्हा मात्र याला अपवाद ठरला आहे. चार दिवसांत पाऊस बरसला असला तरी रोवणी योग्य झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे अवघी पंचवीस टक्के झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

धानाचे कोठार, अशी भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पिकासाठी इतर पिकांच्या तुलनेत अधिक पावसाची गरज राहते. नर्सरीत रोपे टाकल्यानंतर रोवणीसाठी चिखलणी योग्य पाऊस आवश्‍यक असतो. जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस बरसला असला, तरी सुरुवातीच्या समाधानकारक नाही. सुरुवातीच्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. ते रोवणी योग्य झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. तीन आठवडे कडक ऊन तापले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागल्या होत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली.

परंतु भारनियमनामुळे कठीण झाले होते. गत आठवड्यांपर्यंत जिल्ह्यात ४० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. ही एकूण क्षेत्राच्या केवळ २५ टक्के आहे. मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, परंतु हा पाऊस दमदार नव्हता.


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...