नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची नासाडी

नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवस झालेल्या जोरदार पावसाने तब्बल एक लाख ६३ हजार ८४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी केली आहे. जिल्हाभरातील ८८५ गावांतील २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले.
One and a half lakh hectare crop destroyed due to heavy rains in Nagar district
One and a half lakh hectare crop destroyed due to heavy rains in Nagar district

नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवस झालेल्या जोरदार पावसाने तब्बल एक लाख ६३ हजार ८४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी केली आहे. जिल्हाभरातील ८८५ गावांतील २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले.

अतिवृष्टीने व अवेळी पावसाने ८१ हजार ९०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. अडीच हजार हेक्टरवरील फळबागांचेही नुकसान झाले. दोन तालुक्यांत जमिनीही खरडून गेल्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी नियमानुसार तब्बल १८२ कोटी ४४ कोटी रुपयांची गरज आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून ही बाब स्पष्ट झालीय.  

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत सतत पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या महिन्यात तर दहा ते बारा दिवस पाऊस झाला. मात्र, पावसाचा जोर एवढा होता की, ८८५ गावांतील २ लाख ३३ हजार शेतकऱ्याच्या शेतीपिकांची नासाडी केली. दहा दिवसांत सतत झालेल्या अवेळी पावसाने ६४१ गावांतील १ लाख २२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. अवेळी झालेल्या पावसाने जिरायती भागात ३७ हजार ८५५ हेक्टर, बागायती भागात ४१ हजार ६८३ हेक्टर व २ हजार ३६८ हेक्टरवर फळबागांचे नुकसान झाले आहे. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अतिवृष्टी व पुराचा २३१ गावांना तडाखा बसला. या गावांतील १ लाख ११ हजार ४७ शेतकऱ्याचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिरायतीमधील ६२ हजार, बागायतीमधील १९ हजार ५५२ हेक्टर व फळपिकांतील ३२७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले.

याशिवाय पाथर्डीमधील एका गावांत १७ शेतकऱ्यांची ४.६५ हेक्टर व कर्जत तालुक्यातील १२ गावांत १८१ शेतकऱ्यांची ४८.४० हेक्टर जमीन वाहून गेली आहे असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ३३ टक्क्यांपेक्षा जास्ती नुकसानाचीच पंचनाम्यात नोंद आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीची आकडेवारीही मोठी आहे. त्याची मात्र साधी नोंदही घेतलेली नाही. १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार जिरायतीसाठी हेक्टरी ६,५००, बागायतीसाठी १३,५०० व फळबागांसाठी १८,००० रुपये मदत देण्याचे गृहीत धरुन प्रशासनाने अहवाल दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक मदत देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे.

अनेक ठिकाणी बांधावरून पंचनामे नाहीत अतिवृष्टी, अवेळी पाऊस व अन्य आपत्तीने नुकसान झाले तर तलाठी, कृषिसेवक व ग्रामसेवकांनी बांधावर जाऊन पंचनामे करावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. नगर जिल्ह्यात मात्र कृषी विभागाने पंचनाम्याबाबत फारसे गांभिर्याने घेतले नसल्याचा सतत आरोप होत आहे. पंचनाम्यात प्रशासनाचे लोक असले तरी प्रमुख भूमिका कृषी विभागाची आहे. अनेक ठिकाणी कृषी विभागाचे लोक बांधावर गेलेच नाहीत तसेच अनेक ठिकाणी फळबांगाचे नुकसान असूनही पंचनामे केले नाहीत असा आरोप केला जात आहे. कृषी विभागाकडे याबाबत विचारणा केली तर महसुल विभागाकडे बोट दाखवतात.

तालुकानिहाय नुकसान व कंसात बाधित शेतकरी
पाथर्डी ४८,९७२ (५८,७७६)
शेवगाव ३१,०५९ (३६,२५२)
कर्जत २५,११२ (३९,२१२)
श्रीगोंदा २,२४७ (४,९१३)
अकोले २,१४९ (९,५४८)
राहाता २९४ (४३९)
कोपरगाव ११० (२०५)
संगमनेर १७,१११ (२२,७२६)
नेवासा २५,८२३ (४३,२४६)
श्रीरामपूर ७,४७८ (११,२६१)
नगर ३,४२५ (६,६४४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com