नगर : दीड लाख हेक्टरवर कांद्याची लागवड

नगर ः कांदा बियाणांचा तुटवडा, दरात सातत्याने चढउतार आणि बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरीही जिल्ह्यात कांदा क्षेत्र वाढतेच आहे.
On one and a half lakh hectares Onion cultivation
On one and a half lakh hectares Onion cultivation

नगर ः कांदा बियाणांचा तुटवडा, दरात सातत्याने चढउतार आणि बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरीही जिल्ह्यात कांदा क्षेत्र वाढतेच आहे. यंदा आतापर्यंत रब्बीत तब्बल १ लाख ५३ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. खरिपातही ३० हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षभरातील कांद्याचे क्षेत्र १ लाख ८० हजार हेक्टरपर्यंत झाले आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कांदा लागवड आहे. 

कांद्याला गेल्यावर्षी चांगला दर मिळाला. मात्र कोरोनामुळे कांद्याचे दर पडले. त्यात निर्यातीचा प्रश्न तयार झाला. सातत्याने निसर्गाचे बदलते वातावरण, पावसाळ्यात अति पावसाने कांद्याचे नुकसान झाले. रब्बीत लागवडीसाठी पुरेसे बियाणे मिळाले नाहीत. त्यामुळे बियाण्यांची दुप्पट दराने खरेदी करावी लागली. दरातही सातत्याने चढउतार होत आहे.  

तालुकानिहाय कांदा लागवड क्षेत्र

नगर ः १८,५५७, पारनेर ः ३१,१७७, श्रीगोंदा ः २०,१४७, कर्जत ः ११,२७५, जामखेड ः २,५३५, शेवगाव ः ४,५७१, पाथर्डी ः ८४,०४, नेवासा ः ९,६६४, राहुरी ः १०५९२, संगमनेर ः १०,४००, अकोले ः ४,८६६, कोपरगाव ः १०,६८१, श्रीरामपूर ः ७,६९८, राहाता ः ३४०४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com