नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख क्विंटल खरेदी

नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या सहा केंद्रांवर शुक्रवार(ता. ३)पर्यंत ७ हजार २२ शेतकऱ्यांची १ लाख २१ हजार १७२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.
One and a half lakh quintals of gram procured in Nanded district
One and a half lakh quintals of gram procured in Nanded district

नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या सहा केंद्रांवर शुक्रवार(ता. ३)पर्यंत ७ हजार २२ शेतकऱ्यांची १ लाख २१ हजार १७२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावानुसार खरेदी केलेल्या हरभऱ्याचे मूल्य ५९ कोटी ७ लाख १४ हजार ५२३ रुपये होते, असे जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या नांदेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा केंद्रांवर हमीभावाने (४८७५ रुपये प्रतिक्विंटल) हरभरा विक्रीसाठी १६ हजार ४३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १४ हजार ९ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर हरभरा आणण्यासाठी लघू संदेश पाठविण्यात आले आहेत. शुक्रवार(ता. ३)पर्यंत ७ हजार २२ शेतकऱ्यांच्या १ लाख २१ हजार १७२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. आजवर खरेदी केलेल्या हरभऱ्यांपैकी १ लाख ८ हजार ९७ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे, तर १३ हजार ७५ क्विंटल हरभरा पाच केंद्रावरील गोदामात साठविलेला आहे.

केंद्रनिहाय हरभरा खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
केंद्र नोंदणी संख्या खरेदी संख्या हरभरा
नांदेड १८४० १४१७ २३३१७
हदगाव ८३२९ १४८९ २५६३१
किनवट १९९० १२४८ २२३८८
बिलोली १९५० ११६१ १९५३८
देगलूर १५९२ १०६४ १९२१७
मुखेड ७३७ ६४३ ११०७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com