वर्षभरात गांधी आश्रमाकडे वळली दीड लाख पर्यटकांची पावले

वर्धा ः महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम येथील आश्रमाला सरत्या आर्थिक वर्षात तब्बल १ लाख ६२ हजार ९८५ पर्यटकांनी भेट दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही त्यामध्ये समावेश आहे.
One and a half million tourist steps towards Gandhi Ashram
One and a half million tourist steps towards Gandhi Ashram

वर्धा ः महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम येथील आश्रमाला सरत्या आर्थिक वर्षात तब्बल १ लाख ६२ हजार ९८५ पर्यटकांनी भेट दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही त्यामध्ये समावेश आहे. 

सत्य, अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांनी रचनात्मक कार्याच्या बळावर ग्रामोद्योगाचा पाया रचला. त्यांच्या प्रयत्नातूनच गावागावात रोजगार निर्माण होऊन गाव समृद्धीकडे वाटचाल करायला लागली. वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे त्यामुळेच कृषिपूरक व्यवसाय, ग्रामोद्योगात नावारुपास आल्याचे अनुभवले जाते. १९३६ मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना झाली. 

देश सेवेसाठी कार्यकर्ते तयार करणे हा त्याचा उद्देश होता. कार्यकर्त्यांसाठी आवश्‍यक सुविधा आश्रमात निर्माण करण्यात आल्या असल्यातरी आश्रम श्रमाधारीत होते. आश्रमात सामूहिक जीवनपद्धती होती, हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. आजही आश्रमात श्रम प्रतिष्ठा जपण्यावर भर दिला गेला आहे. त्यामुळे देशविदेशातील सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र सेवाग्राम आश्रम झाला आहे. त्यामध्ये बहुतांशी विदेशी अभ्यासकांचा समावेश आहे. 

नव्या पिढीला गांधीजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता स्मारक तर आहेच. पण त्यासोबतच ग्रामोद्योग, सूतकताई, रंगाई, विनाई तसेच शेती व गोशाळा देखील आहे. प्रात्याक्षिक या निमित्ताने भेट देणाऱ्यांना अनुभवता येते. संगिता चव्हाण, अश्‍विनी बघेलव रुपाली उंबरकर यांच्याव्दारे आश्रमाला भेट देणाऱ्यांना पूरक माहिती दिली जाते.

१५० वे जन्मशताब्दी वर्ष महात्मा गांधी व कस्तुरबा यांचे १५० वे जन्मशताब्दी वर्ष सद्यःस्थितीत साजरे केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आश्रमाला भेट दिली होती. गेल्या वर्षभरात १ लाख ६२ हजार ९८५ पर्यटकांनी आश्रमाला भेट दिली आहे. मे मध्ये ६५९८ तर डिसेंबर २०१९ मध्ये सर्वाधिक ३३६९७ पर्यटकांची नोंद करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com