नांदेड जिल्ह्यात दीड महिन्यात ५६ टक्के पाऊस

नांदेड : जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने जुलैमध्येही जोर धरला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला. यंदा दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पावसाची नोंद झाली. तर आठ मंडळांत ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
One and a half  month 56% rainfall in Nanded district

मराठवाड्यात हमखास पावसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८१४.१८ मि.मी पाऊस पडतो. तर जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याची सरासरी ८९१.३० मि.मी आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली होती.

जूनमध्ये जोरदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यतंरी ओढ दिली. त्यामुळे पिके धोक्यात आली होती. परंतु जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला. 

यंदा एक जून ते १५ जुलै दरम्यान जिल्ह्यात ५६.३० टक्क्यांनुसार सरासरी ४५०.१० मि.मी पाऊस झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com