Agriculture news in marathi One and a half thousand in Chiplun People pulled out of the flood | Agrowon

चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याला बसला. चिपळूणवासियांनी ४८ तास जलप्रलंयात काढले आहेत.

रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याला बसला. चिपळूणवासियांनी ४८ तास जलप्रलंयात काढले आहेत. शुक्रवारी (ता.२३) सुमारे दीड हजार लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात यश आले. पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे, पंरतु पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सखल भागात व पूरप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

चिपळूण तालुक्यातील आतापर्यंत सुमारे १२०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्या ठिकाणी भोजन, पाणी व निवासाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहेत. वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील पोसरे धामणन बोद्धवाडी येथे दरड कोसळल्याने ७ कुटुंबातील १७ जण व २४ जनावरे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दहा जण जखमी असून, उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. 

खेडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन 
खेड तालुक्यातील धावडे सुतारवाडी येथील रस्ता खचला आहे. वडगाव बिरमणी रोडवर ठीक ठिकाणी गाव अंबावली बाऊलवाडी येथे जमिनीचे भूस्खलन होत असून, घरांना भेगा गेलेल्या आहेत. त्यामुळे तेथील तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जिल्हा परिषद शाळा अंबावली येथे हलविण्यात आले आहे. पंधरा गावे आणि वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. निव्यामधील गारवणे पूल वाहून गेला असून, चोरवणे गरकडवाडी येथे भूस्सखलन झाले आहे. चोरवणे सुतारवाडी येथील ब्रीज वाहून गेला आहे. चोरवणे सापीर्ली जोडणारा पूल वाहून गेला तर, पोसरे बोद्धवाडीमधे भूस्सखलन झाले आहे. सापीर्ली सिमेचीवाडी गडगड्यामार्गेचा मुख्य पुलाची मोठीहानी झाली आहे. तलवट धरणाची एकबाजू फुटल्यामुळे बौद्धवाडी पाण्याखाली गेले आहे. वावे काजू फाटा पूल वाहून गेला आहे. 
मुंबई गोवा महामार्गावर वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग कोसळला असल्याने महामार्ग बंद झाला आहे. धामनंद (ता. खेड) येथे दरड कोसळल्यामुळे तीन व्यक्ती मृत झाल्या असून, अंदाजे १६ ते १७ व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या असण्याची शक्यता आहे. 

घरावर कोसळली दरड 
संगमेश्वर तालुक्यातील दक्खन (साखरपा) माईन वाडी येथे कमलाकर गणू माईन यांच्या घरावर व वाड्यावर दरड कोसळल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. 
मध्यरात्री झोपेच्या वेळेतच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने सारेच भयभीत झाले, काही करावे काही सूचेना, अशा परिस्थितीत एकमेकांना धीर देत संपूर्ण माईनवाडीचे मध्यरात्रीच दक्खन शाळेमध्ये स्थलांतर केले. दक्खन माईन वाडीजवळील कोजबट डोंगराला भेगा गेल्याने धोका कायम असून, कधीही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे स्थलांतर करणे आवश्यक असून, मदतीची गरज आहे. त्याचबरोबर दक्खन जवळील रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील दरड पूर्णपणे रस्त्यावर आल्याने महामार्ग बंद असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संबंधित खाते या ठिकाणी लक्ष ठेऊन आहे. काजळी नदीने केले रौद्ररूप धारण केले आहे. 
रत्नागिरीतील चांदेराई, सोमेश्वर गावातील लोक तीस तासांहून अधिककाळ पुराच्या पाण्यात आहेत. 

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती

 

 • अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी तालुक्याला बसला 
 • चिपळूणवासियांनी ४८ तास जलप्रलंयात काढले 
 • शुक्रवारी (ता.२३) सुमारे दीड हजार लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले 
 • धरणक्षेत्रात पाऊस, चिपळूण शहरात पूरपरिस्थितीची शक्यता 
 • खेडमधील पोसरे धामणन बोद्धवाडीत दरड कोसळल्याने ७ कुटुंबातील १७ जण व २४ जनावरे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता 
 • खेडमधील अंबावली बाऊलवाडी येथे जमिनीचे भूस्खलन 
 • मुंबई-गोवा महामार्गावर वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग कोसळला 
 • रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर दरड पूर्णपणे रस्त्यावर आल्याने महामार्ग विस्कळीत 
 • रत्नागिरीतील चांदेराई, सोमेश्वर गावातील लोक तीस तासांहून अधिककाळ पुराच्या पाण्यात 
   

इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...