agriculture news in marathi One and a half thousand km of Panand roads will be opened: Dr. Deshmukh | Agrowon

दीड हजार किलोमीटर पाणंद रस्ते खुले करणार : डॉ. देशमुख

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 मार्च 2021

पुणे ः जिल्ह्यात आत्तापर्यंत ९३१ पाणंद रस्ते निश्चित केले आहेत. या रस्त्यांची लांबी १ हजार २२९ कि.मी. आहे. सर्व तालुक्यांमध्ये १०५ रस्त्यांची कामे लोकसहभागातून सुरू आहे.

पुणे ः ‘‘जिल्ह्यात आत्तापर्यंत ९३१ पाणंद रस्ते निश्चित केले आहेत. या रस्त्यांची लांबी १ हजार २२९ कि.मी. आहे. सर्व तालुक्यांमध्ये १०५ रस्त्यांची कामे लोकसहभागातून सुरू आहे.  यामध्ये १४६ किलोमीटर रस्ते खुले होतील. सुमारे १ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते खुले करण्याचे उद्दिष्ट आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

नुकतीच जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी या योजनेमध्ये आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. 

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १ हजार ४८३ गावे आहेत. सर्व ग्रामपंचायतींकडून या गावांमध्ये किती रस्ते शेत रस्ते, पाणंद रस्ते खुले करणे आवश्यक आहे. या साठीचे प्रस्ताव सर्व ग्रामपंचायतींकडून ३१ मार्चपूर्वी घ्यावेत.केवळ पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त न करता त्या रस्त्यांचे मजबुतीकरण देखील होईल.’’ 

‘‘‘मनरेगा’मधून या सर्व रस्त्यांचे नियोजन होईल. तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना या रस्त्यांची अंदाजपत्रके युद्धपातळीवर करणे, त्यांच्या प्रशासकीय मान्यता देणे, याबाबत निर्देश देण्यात आले. ‘मनरेगा’मधून आत्तापर्यंत १०५ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे,’’ असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

  नवीन कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता

‘‘१ एप्रिल २०२१ या आर्थिक वर्षापासून उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल. एप्रिल/ मे मध्ये या कामांना मोठया प्रमाणावर सुरुवात करून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल’’, असे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...