पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न राज्यभर राबविणार

‘एक पुस्तक’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे ओझे हलके झाले आहे. एकाच पुस्तकात सर्व विषय वाचायला मिळतील. विद्यार्थ्यांना दर तीन महिन्याला नवीन पुस्तकाचा आनंद मिळेल. यामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढेल. - सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
The 'One Book' pattern of Pune Zilla Parishad will be implemented across the state
The 'One Book' pattern of Pune Zilla Parishad will be implemented across the state

पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्व विषयांचे ‘एकच पुस्तक’ हा पॅटर्न राबविण्यात आला. हा ‘पॅटर्न’ विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असल्यामुळे आता तो राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी अभ्यासक्रम तयार केला जात आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबत धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने पहिली ते सातवीपर्यंत एकच पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना दिले होते. त्या वेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या प्रयत्नातून हा प्रयोग करण्यात आला. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही विभागाकडे अहवाल मागितला होता. अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा अतिरिक्त संच शाळेत ठेवतात. मात्र, शासकीय शाळांना प्रत्येकवेळी हे परवडणारे नसल्याचे लक्षात आले. 

जिल्हा परिषदेने मात्र बालभारतीच्या पुस्तकांबरोबरच स्वतःचा सर्व विषयांचा तिमाही अभ्यासक्रम असणारे एकच पुस्तक विद्यार्थ्यांना देऊन दप्तराचा भार हलका केला होता. त्यासाठी शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी विशेष प्रयत्न करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्याचे चांगले परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले. त्याामुळे राज्यातही हा पॅटर्न राबविण्यात येईल. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबच एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय पुस्तके द्विभाषिक करण्याचाही निर्णय घेतला आहे. भाषेव्यतिरिक्‍त इतर विषयांच्या पुस्तकांत संकल्पना इंग्रजीतूनही देण्यात येतील. येत्या शैक्षणिक वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर अशी पुस्तके तयार केली जातील. त्यासाठी बालभारतीच्या अधिकाऱ्यांनादेखील सूचना दिल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com