Agriculture news in marathi One per cent reduction in electricity tariff for agricultural pumps in the state | Agrowon

राज्यात शेतीपंपासाठीच्या वीज दरात एक टक्के कपात 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

मुंबई : नेहमीच वीज दरवाढीचा बोजा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी (ता. ३०) वीज दरात कपात करून सुखद धक्का दिला. यामुळे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

मुंबई : नेहमीच वीज दरवाढीचा बोजा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी (ता. ३०) वीज दरात कपात करून सुखद धक्का दिला. यामुळे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी करण्याची घोषणा करताना सरकारी महावितरणसह टाटा, अदानी या खासगी वीज कंपन्यांना शॉक दिला आहे. आयोगाने जाहीर केलेले नवे वीज दर येत्या १ एप्रिलपासून लागू होतील. वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सोमवारी ही कपात जाहीर केली. 

आयोगाच्या निर्णयानुसार मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठ्या भागात टाटा आणि अदानी या खासगी कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल १० ते ११ टक्क्यांनी कमी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत पश्चिम उपनगरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

या निर्णयानुसार मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की त्यानुसार ते दर येत्या ५ वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे सरकारला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम असतील, असे श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

घेतलेले महत्त्वाचे निर्णय 

  • मुंबई वगळता उर्वरित भागातील दर कपात 
  • औद्योगिक वीज दर १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार 
  • घरगुती वापराच्या वीज दरात ५ ते ७ टक्के घट 

'गेल्या १५ वर्षात प्रथमच अशा प्रकारे वीज दरात कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळेल. वीज दर कपातीमुळे उद्योग-व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील' 
- आनंद कुलकर्णी, 
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...