हिंगोलीत राज्य राखीव दलातील २५ जवानांसह एक नागरिक पॉझिटिव्ह

हिंगोली : येथील राज्य राखीव दलातील बंदोबस्ताहून आलेल्या नवीन २५ जवान आणि नांदेड येथील अडकलेल्या भाविकांना पंजाब येथे सोडण्यासाठी गेलेला एक व्यक्ती अशा एकूण २६ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे.
 One civilian and 25 jawans in State Reserve Force are positive In Hingoli
One civilian and 25 jawans in State Reserve Force are positive In Hingoli

हिंगोली : येथील राज्य राखीव दलातील बंदोबस्ताहून आलेल्या नवीन २५ जवान आणि नांदेड येथील अडकलेल्या भाविकांना पंजाब येथे सोडण्यासाठी गेलेला एक व्यक्ती अशा एकूण २६ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तसा अहवाल शुक्रवारी (ता.१) प्राप्त झाला आहे. हिंगोली येथील राज्य राखीव दलातील एकूण ४१ जवानांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ३३ जवान हे मालेगाव, तर ८ जवान हे मुंबई येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. 

एकूण ४० जवान हे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती आहेत. जालना राज्य राखीव दलातील जवानास औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २ व्यक्ती, सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील एक बालक, बार्शी येथून वसमत येथे आलेला १ व्यक्ती अशा एकूण ४४ रुग्णांना हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील एक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सवर कार्यरत आहे. तो भाविकांना सोडण्यासाठी पंजाब येथे गेला होता. तो परतल्यानंतर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड येथे त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतू शनिवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. 

सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहेत. नागरिकांनी आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

कोरोना विरुध्द लढ्यासाठी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करावे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपली व कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com