नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे. सापडलेला रुग्ण ३० वर्षाचा तरुण असून तो निफाड तालुक्‍यातील आहे.
corona
corona

नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे. सापडलेला रुग्ण ३० वर्षाचा तरुण असून तो निफाड तालुक्‍यातील आहे. त्याचा तपासणीसाठी पाठवलेला ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण तपासणीसाठी पाठविलेल्या ९ रुग्णांच्या नमुन्यांपैकी, आठ निगेटिव्ह आले असून एकमेव पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा रुग्णालयाकडून पमिळालेल्या माहितीनुसार लासलगाव (ता. निफाड) जवळील नंदनवननगर, पिंपळगावनजीक येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय तरुण हा रजानगर येथील बेकरीत कामाला होता. १२ मार्चला खोकला व ताप आल्याने त्याने खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले; परंतु त्याला बरे न वाटल्याने तो लासलगाव ग्रामीण रुग्णालयात २५ मार्चला उपचारासाठी गेला. न्यूमोनियासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. 

संबंधित तरुण स्वत:च्या वाहनाने २७ मार्चला नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता. २९) प्राप्त झाला, त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. उर्वरितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

कुटुंबातील चौघे क्वारंटाइन  जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाइन कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. दावल साळवे यांचे पथक लासलगाव येथे रवाना झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला युवक हा निफाड येथे गेला असता त्यास कोरोनाची लागण झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने निफाड परिसरात कोण परदेशातून आला आहे का याचा शोध घेतला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com