आजऱ्यात श्रमदानातून एक कोटीचे काम 

आजरा तालुक्‍यातील विविध गावांत ६६ पाणंदी अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या. सुमारे ७५ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले. प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात आली.
panand kop
panand kop

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यातील विविध गावांत ६६ पाणंदी अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या. सुमारे ७५ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले. प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात आली. श्रमदानातून सुमारे एक कोटी रुपयाचे काम झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य केले असून एक प्रकारे आदर्श तयार केला आहे. 

पाणंदीमधील अतिक्रमणे काढून शेतीकडे जाण्यासाठी रस्ते तयार करावेत, शेतीमाल थेट बाजारपेठेत जावा यासाठी महसूल प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. यावेळी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. ग्रामस्थांनी श्रमदान करून अडचणीच्या ठिकाणी जेसीबी यंत्राचा वापर करून पाणंदी खुल्या केल्या. अनेक गावांत ग्रामस्थांच्या पुढाकाराने पाणंदी खुल्या झाल्या. 

मुंगूसवाडी, हाजगोळी खुर्द, सुलगाव, मडिलगे, सोहाळे, हात्तीवडे, मुरुडे, आजरा, कर्पेवाडी, सावरवाडी, आजरा, होनेवाडी, आवंडी, कर्पेवाडी खालसा, मुमेवाडी, मासेवाडी, भादवण, भादवणवाडी, झुलपेवाडी, उत्तूर, कर्पेवाडी दुमाला, वझरे, धामणे, बहिरेवाडी, हरपवडे, विनायकवाडी, पेरणोली, घाटकरवाडी, सुळेरान, साळगाव, कुरकुंदे, आवंडी, पारपोली, हाळोली, देवर्डे, शेळप, मोरेवाडी, यमेकोंड, चितळे, हांदेवाडी, कोळींद्रे, चाफवडे, सरंबळवाडी, वाटंगी, यमेकोंड, मलिग्रे, पोश्रातवाडी, गजरगाव, किणे, लाकूडवाडी या गावांतील पाणंदी खुल्या केल्या आहेत. काही गावांत चार, तर काही गावांत दोन पाणंदी खुल्या करण्यात आल्या. तालुक्‍यात एकूण ६६ पाणंदी खुल्या झाल्या आहेत.  प्रतिक्रिया  अनेक गावांत ग्रामस्थांनी पुढाकार घेत पाणंदी खुल्या केल्या. प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य केले. हा एक आदर्श पायंडा असून तालुक्‍यात सुमारे १०० पाणंदी खुल्या करण्याचे नियोजन आहे.  - डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी, भुदरगड-आजरा.  पाणंदी खुल्या करण्यासाठी ग्रामस्थ पुढे येत आहेत. शेतातील उत्पादने थेट रस्त्यावर आणता येणार आहेत. बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याकरिता चांगली मदत होणार आहे.  - विकास अहीर, तहसीलदार, आजरा.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com