agriculture news in Marathi one crore cost of works from shramdan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

आजऱ्यात श्रमदानातून एक कोटीचे काम 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

आजरा तालुक्‍यातील विविध गावांत ६६ पाणंदी अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या. सुमारे ७५ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले. प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात आली.

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यातील विविध गावांत ६६ पाणंदी अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या. सुमारे ७५ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले. प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात आली. श्रमदानातून सुमारे एक कोटी रुपयाचे काम झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य केले असून एक प्रकारे आदर्श तयार केला आहे. 

पाणंदीमधील अतिक्रमणे काढून शेतीकडे जाण्यासाठी रस्ते तयार करावेत, शेतीमाल थेट बाजारपेठेत जावा यासाठी महसूल प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. यावेळी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. ग्रामस्थांनी श्रमदान करून अडचणीच्या ठिकाणी जेसीबी यंत्राचा वापर करून पाणंदी खुल्या केल्या. अनेक गावांत ग्रामस्थांच्या पुढाकाराने पाणंदी खुल्या झाल्या. 

मुंगूसवाडी, हाजगोळी खुर्द, सुलगाव, मडिलगे, सोहाळे, हात्तीवडे, मुरुडे, आजरा, कर्पेवाडी, सावरवाडी, आजरा, होनेवाडी, आवंडी, कर्पेवाडी खालसा, मुमेवाडी, मासेवाडी, भादवण, भादवणवाडी, झुलपेवाडी, उत्तूर, कर्पेवाडी दुमाला, वझरे, धामणे, बहिरेवाडी, हरपवडे, विनायकवाडी, पेरणोली, घाटकरवाडी, सुळेरान, साळगाव, कुरकुंदे, आवंडी, पारपोली, हाळोली, देवर्डे, शेळप, मोरेवाडी, यमेकोंड, चितळे, हांदेवाडी, कोळींद्रे, चाफवडे, सरंबळवाडी, वाटंगी, यमेकोंड, मलिग्रे, पोश्रातवाडी, गजरगाव, किणे, लाकूडवाडी या गावांतील पाणंदी खुल्या केल्या आहेत. काही गावांत चार, तर काही गावांत दोन पाणंदी खुल्या करण्यात आल्या. तालुक्‍यात एकूण ६६ पाणंदी खुल्या झाल्या आहेत. 

प्रतिक्रिया 
अनेक गावांत ग्रामस्थांनी पुढाकार घेत पाणंदी खुल्या केल्या. प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य केले. हा एक आदर्श पायंडा असून तालुक्‍यात सुमारे १०० पाणंदी खुल्या करण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी, भुदरगड-आजरा. 

पाणंदी खुल्या करण्यासाठी ग्रामस्थ पुढे येत आहेत. शेतातील उत्पादने थेट रस्त्यावर आणता येणार आहेत. बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याकरिता चांगली मदत होणार आहे. 
- विकास अहीर, तहसीलदार, आजरा. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...