सातारा जिल्ह्यात दूध उत्पादकांना प्रतिदिन एक कोटी दरवाढ

दूध
दूध

सातारा ः जिल्ह्यात गाईचे दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलन होत आहे. राज्य शासनाने दुधास लिटरमागे पाच रुपये वाढ केल्याने जिल्ह्यात प्रतिदिनी एक कोटी रुपये प्रतिदिन अधिक मिळत आहेत. या दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, धोक्यात आलेला दूध व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे.   दुधाचे दर १८ ते २१ रुपये लिटर गेल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला होता. एेन उन्हाळ्यात दराची ही अवस्था तर पावसाळ्यात कसे होईल, या भीतीने अनेक शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकावी लागली होती. मिळत असलेल्या दरात भांडवली खर्च निघत नसल्याने दुध उत्पादक व्यवसाय तोट्यात चालवत होते. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी जागोजागी आंदोलन करण्यात आली होते. आंदोलनाच्या काळात एकूण दुधापैकी दहा ते अकरा टक्के दुधाचे संकलन होत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने प्रति लिटर पाच रुपयांने वाढ करत २५ रुपये एक लिटर दर देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाप्रमाणे एक अॅागस्टपासून नवीन दर वाढ लागू करण्यात आली आहे.   जिल्ह्यात सुमारे ६९ लहान मोठ्या संस्थांकडून दुधाचे संकलन होते. यामध्ये सहा सहकारी, पाच मलिस्टेट तर ५७ खासगी संस्थाचा सहभाग आहे. २३ लाख लिटरवर दैनंदिन दुध संकलन केले जाते. यामध्ये गाईचे सुमारे २० लाख लिटर दुधाचा हिस्सा आहे. या दुधास प्रतिलिटर पाच रुपयांने वाढ केली असल्याने दैनंदिन एक कोटीचा आधिक लाभ मिळणार आहे. सध्या जिल्ह्यात दुधाचे संकलन सुरळीत सुरू आहे. वाढलेला दरामुळे किमान तोटा तरी होणार नसल्याने शेतकऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या दुध व्यवसाय उभा रहाण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com