Agriculture news in Marathi One crore increase in MLAs' local development fund | Page 3 ||| Agrowon

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरून तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता.

मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरून तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवारांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांच्यात सुद्धा आनंदाचे वातावरण असून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. 

 गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांचा विकास निधी गोठवला आहे. त्यामुळे स्थानिक विकास कामांसाठी खासदारांच्याकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. तर राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटीची वाढ करून तो तीन कोटी करण्याची घोषणा सभागृहात केली होती. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ६२ अशा एकूण ३५० आमदारांना ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येक वर्षी एकूण १४०० कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळणार 
आहे.


इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
फळबाग, जिरॅनियम प्रक्रियेतून शाश्‍वत...नागठाणे (जि. सातारा) येथील सुनील हणमंत साळुंखे...
अभ्यासपूर्ण शेतीतून मिळवले हंगामी...मालेगाव (जि. वाशीम) येथील सय्यद शारीक सय्यद गफूर...
बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे...पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे....
२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक...ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...