पुणे जिल्हा परिषदेतर्फे कर्मचाऱ्यांना एक कोटीच्या विम्याचे कवच

पुणे: ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर काम करणारे आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांना विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीन या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी १ कोटी रुपयांचा जीवन विमा काढण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.
One crore insurance cover for employees of Pune Zilla Parishad
One crore insurance cover for employees of Pune Zilla Parishad

पुणे : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर काम करणारे आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांना विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीन या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी १ कोटी रुपयांचा जीवन विमा काढण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी दिली. 

रणजीत शिवतरे म्हणाले की, ‘कोरोना’च्या उपायोजनांबाबत काम करणाऱ्या आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना एक हजार रुपये प्रोत्साहन मानधन, रुग्णवाहिकेच्या इंधनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रास दहा हजार रुपये, आरोग्य कर्मचाऱ्यांना फिरतीसाठी दोन हजार रुपये प्रवासभत्ता देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि मुख्याध्यापकांमार्फत विद्यार्थ्यांना आहार घरपोच पोचविण्यासाठी तसेच घरपोच रेशन पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत वाहनाची सुविधा उपलब्ध दिली जाणार आहे.  

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, दिव्यांग व गर्भवती महिला यांना दुकानदार व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून जीवनावश्‍यक वस्तू घरपोच द्याव्यात, किराणा माल व जीवनावश्‍यक वस्तू पुरवठा करणाऱ्या दुकानांवर गर्दी होणार नाही, यासाठी नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर वाड्या, वस्त्या, गावठाण सोडियम हाय्रड्रोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करावे, प्रतिकुटुंब दोन याप्रमाणे साबणाचे वाटप करावे, त्याचा खर्च ग्रामविकास निधीतून करण्यासह परवानगी देण्यात आल्याचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी सांगितले.

‘कोरोना’ प्रतिबंधात्मक कारवाई करताना ग्रामीण भागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. क्षेत्रिय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे प्रत्येकी एक कोटी रुपयांचे कवच जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार आहे. आरोग्य सेविका, सेवक, आशा वर्कर यांना प्रोत्साहन मानधनही देण्यात येणार आहे.  - रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com