केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाखांची मदत

केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाखांची मदत
केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाखांची मदत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये दिला आहे. यामध्ये बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचे २१ लाख व बँकेच्या वतीने ८० लाख असा निधी उभारला आहे. निधीचा हा धनादेश बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी मुंबईत भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.  संचालक मंडळाच्या सभेत ९ ऑगस्ट रोजी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराची होणारी रक्कम २१ लाख रुपये व बँकेच्या वतीने ८० लाख रुपये, अशी एक कोटी एक लाख रुपये निधीची उभारणी केली. या निधीबद्दल मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरात महापुरामुळे झालेल्या घाणीचे साम्राज्य हटवण्यासाठी बँकेने केलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल श्री. फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बँकेचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संचालक आर. के. पोवार,  राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी प्रमुख उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com